व्यापार: एअरटेलचे रिचार्ज महागले; ७९९ चा प्लॅन बंद, ८५९ चा प्लॅन महागला
यावर्षी रिचार्ज प्लान महाग होऊ शकतात अशी चर्चा होती आणि आता एअरटेलनं त्याची सुरुवात केल्याचं दिसत आहे. एअरटेलनं आपल्या ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटी असलेल्या प्लान्समध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. कंपनीनं केवळ काही स्वस्त प्लॅन्स बंदच केले नाहीत, तर आधीपासून अस्तित्वात असलेले प्लॅन्स महागही केले आहेत.
आंतरराष्ट्रीय: नेतन्याहू यांना कर्करोग: धक्कादायक खुलासा, उपचारानंतर झाले ठणठणीत
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याचे निदान झाले होते, ज्यावर त्यांनी गुप्तपणे उपचार घेतले. 2024 च्या अखेरीस ट्यूमर काढण्यात आला. इराणसारख्या शत्रूंनी फायदा घेऊ नये, म्हणून माहिती लपवली. जेरुसलेममधील हदासा रुग्णालयात उपचारानंतर आता ते कर्करोगमुक्त झाले आहेत.
राष्ट्रीय: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; राज्यसभेतील ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी विरोधकांनी राज्यसभेत त्यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडला असून, या प्रस्तावात सुमारे ७३ विरोधी खासदारांनी पक्षपाती वर्तन आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
राष्ट्रीय: आम आदमी पार्टीत उभी फूट; राघव चड्ढांसह ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
AAP : दिल्लीच्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे. 'आम आदमी पक्षा'चे संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, त्यांनी पक्षातील दोन-तृतीयांश खासदारांसोबत भाजपमध्ये विलीन होणार असल्याचे जाहीर केले आहे. या खासदारांमध्ये क्रिकेटर हरभजनसिंग, संदीप पाठक यांच्यासह ७ खासदारांचा समावेश आहे.
व्यापार: सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी मागणी पुढे आली आहे. भारतीय प्रतीरक्षा मजदूर संघ (BPMS) ने ८व्या वेतन आयोगासमोर किमान बेसिक पगार ७२,००० रुपये, तर कमाल १० लाख रुपये आणि फिटमेंट फॅक्टर ४.० करण्याची मागणी केली आहे. BPMS ही संरक्षण क्षेत्रातील नागरी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना असून, ती National Council Joint Consultative Mechanism (NC-JCM) च्या स्टाफ साइडची सदस्य आहे.
व्यापार: देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Claude Mythos Threats: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत आर्टिफीशल इंटेलिजन्स (AI) मॉडेल Claude Mythos आणि त्यातून उद्भवू शकणाऱ्या सायबर सुरक्षा धोक्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
व्यापार: सोनं-चांदी स्वस्त; काय आहेत आजचे नवे दर?
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या चार दिवसांत सराफा बाजारात सोन्याच्या भावात सुमारे १७०० रुपयांची घट झाली आहे. तर, याच काळात चांदीच्या दरात ९६२३ रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज शुक्रवार, २४ एप्रिल रोजी देखील २४ कॅरेट सोन्याचा भाव ३९५ रुपयांनी स्वस्त होऊन १,५०,६६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे.
व्यापार: अदानींनी अंबानींना टाकले मागे, १०० अब्ज डॉलर क्लबमध्ये प्रवेश
गौतम अदानी यांनी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये प्रवेश करत मुकेश अंबानींना मागे टाकले. अदानींची एकूण संपत्ती १०६ अब्ज डॉलरवर पोहोचली, जी बिल गेट्स यांच्यापेक्षा जास्त आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये ते १७ व्या, तर अंबानी २० व्या स्थानी आहेत.
व्यापार: इकडे अमेरिका पाहत राहिला; तिकडे भारताने न्यूझीलंडसोबत केला मुक्त व्यापार करार...
एकीकडे भारत आणि अमेरिकेमधील व्यापार कराराबाबत (India-US Trade Deal) अनिश्चितता कायम आहे, तर दुसरीकडे भारत आता न्यूझीलंडसोबतच्या मुक्त व्यापार कराराला (FTA) अंतिम रूप देत आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी घोषणा केली की, दोन्ही देश येत्या २७ एप्रिल रोजी या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करणार आहेत. या करारामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांना भारतीय बाजारपेठेत मोठी संधी मिळेल.
व्यापार: शाहरुखच्या मॅनेजरनं वांद्रे येथे खरेदी केले तीन आलिशान फ्लॅट्स, किंमत किती?
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची दीर्घकाळापासूनची मॅनेजर पूजा गुरनानी, तिचे पती हितेश प्रकाश गुरनानी आणि वडील मोहन सियाराम दादलानी यांनी मुंबईतील वांद्रे भागातील कार्टर रोडवर तीन शानदार अपार्टमेंट्स खरेदी केलेत. 'CRE मॅट्रिक्स'ने नोंदणी कार्यालयातील कागदपत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, या तिन्ही फ्लॅट्सची एकूण किंमत ₹३८.२१ कोटी आहे. हे तिन्ही फ्लॅट 'वरुण' बिल्डिंगमध्ये असून प्रत्येक फ्लॅटची किंमत ₹१२.७३ कोटी आहे.
व्यापार: अनेक देशांकडून सुवर्ण साठ्यात वाढ, डॉलरवरील अवलंबित्व करताहेत कमी
गेल्या काही वर्षांपासून भारत, चीन आणि पोलंडसारख्या अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आपल्या राखीव साठ्यात सोन्याचं प्रमाण वाढवलं आहे. सतत वाढता भू-राजकीय तणाव आणि ट्रेड वॉर सारख्या परिस्थितीमुळे आता चीनसारखे अनेक देश डॉलरवरील आपलं अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत.
व्यापार: तुमचा बँक बॅलेंस कमी नाही ना? बँकांनी तीन वर्षांत पेनल्टीच्या नावाने वसूल केले ₹१९,००० कोटी...
बँकेत मिनिमम बॅलेन्स मेंटेन केले नाही, तर बँक तुमच्याकडून पेनल्टी आकारते. याच दंडातून भारतीय बँकांनी गेल्या तीन वर्षांत तब्बल १९,०८३ कोटी रुपये मिळवल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा पाहून, लहान-लहान शुल्कांच्या स्वरूपात वसूल होणारी ही रक्कम ग्राहकांच्या खिशावर मोठा आर्थिक भार टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्यापार: Microsoft ची मोठी ऑफर: एकरकमी पैसे घ्या, नोकरी सोडा!
जगातील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर ‘स्वैच्छिक निवृत्ती’ ऑफर करत आहे. रिपोर्टनुसार, अमेरिकेत काम करणाऱ्या सुमारे ७% कर्मचाऱ्यांना ही ऑफर मिळणार आहे. या योजनेअंतर्गत कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना एकरकमी मोठी रक्कम देऊन स्वतःहून नोकरी सोडण्याचा पर्याय देत आहे.
मुंबई: शिंदेसेनेत वाद! मराठी सक्तीचा निर्णय मागे घ्या; निरुपम यांचे पत्र
रिक्षाचालकांसाठी मराठी सक्तीवरून शिंदे सेनेत मतभेद असल्याचे समोर आले आहे. पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेला विरोध करत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. मुंबईसारख्या बहुसांस्कृतिक महानगरात सुमारे ७० टक्क्याहून अधिक रिक्षा टॅक्सी चालक हे गुजरात, उत्तर भारत, पंजाब तसेच दक्षिण भारतातील विविध भागांमधून आलेले आहेत. त्यांच्या मनात भीती आणि असंतोष वाढतोय असं त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञान: मेटा, मायक्रोसॉफ्टमधील २३ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
मेटा आणि मायक्रोसॉफ्ट मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याची योजना आखत आहेत, ज्यामुळे सुमारे २३ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. खर्च कमी करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (AI) मोठी गुंतवणूक करणे हे यामागचे कारण आहे. मेटा १०% कर्मचारी कपात करणार आहे तर मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू केली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
व्यापार: शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, फार्मा-आयटीमध्ये विक्री
शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात हलक्या घसरणीसह झाली, त्यानंतर ही घसरण वाढताना दिसली. सकाळी ९:३० वाजता सेन्सेक्स ४४२ अंकांनी घसरून ७७,२२१ वर व्यवहार करत होता. याच काळात निफ्टी १३० अंकांनी घसरून २४,१०० च्या खाली घसरला होता. बँक निफ्टीमध्येही १६३ अंकांची घसरण झाली असून तो ५६,१५० च्या आसपास होता.
व्यापार: दांपत्याचे रुग्णालयाला मोठे दान, मुलांसाठीही अब्जावधींची मदत
डेल टेक्नॉलॉजीजचे (Dell Technologies) संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मायकल डेल आणि त्यांची पत्नी सुसान डेल सध्या त्यांच्या दातृत्वामुळे चर्चेत आहेत. या दांपत्यानं नुकतेच युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ऑस्टिनला ६,९०० कोटी रुपये (७५० मिलियन डॉलर) दान देण्याची घोषणा केली आहे.
क्राइम: नाशिकमध्ये आणखी एक भोंदूबाबा समोर, महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप
नाशिकमध्ये महेश काकडे नामक भोंदूबाबाने भूत उतरवण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचा महिलेचा आरोप आहे. मानसिक स्थितीचा फायदा घेऊन आरोपीने महिलेचे विवस्त्र फोटो काढले. कुटुंबीयांच्या भीतीमुळे आणि संशयित आरोपीच्या प्रभावामुळे महिलेने तक्रार देण्याचे टाळले. संशयित आरोपीने तिचे मोबाइलमधील पुरावेही जबरदस्तीने डिलीट केल्याचे समोर आले आहे. माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तू विरोध करू शकणार नाही अशी भीती दाखवत महिलेशी संबंध ठेवले.
व्यापार: ₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा उघड; ED कडून अनेक ठिकाणी छापे
हरियाणातील पंचकुला नगरपालिकेच्या मुदत ठेवीशी (FD) संबंधित सुमारे १४५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ED) गुरुवारी मोठी कारवाई केली. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले असून बुधवारी चंदीगड, पंचकुला (हरियाणा), तसंच पंजाबमधील झिरकपूर, डेराबस्सी आणि राजपुरा अशा सुमारे डझनभर ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली.
मुंबई: मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक
मुंबईतील भांडुपमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून नऊ जण कोसळले. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना एका लग्नसमारंभाजवळ घडली. प्रथम एक व्यक्ती पडला, त्याला वाचवताना इतर आठ जणही खाली पडले. जखमींमध्ये सहा लग्नातील आणि तीन कामगारांचा समावेश आहे.
क्रिकेट: संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
संजू सॅमसनचं नाबाद शतक आणि गोलंदाजीत अकिल होसीनचा इम्पॅक्टफुल 'चौकारा'च्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला एकतर्फी पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना संजूनं 'वन मॅन आर्मी' शोचा नजराणा पेश करत ५४ चेंडूत केलेल्या नाबाद १०१ धावांच्या जोरावर चेन्नईच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २०७ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ १०४ धावांत आटोपला. चेन्नईनं १०३ धावांसह सामना जिंकत IPL मधील सर्वात मोठ्या विजयासह नवा विक्रम प्रस्थापित केला.
क्रिकेट: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर संजू सॅमसन याने वानखेडेच्या मैदानातील मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ५४ चेंडूत यंदाच्या हंगामातील दुसरे आणि आयपीएलमधील पाचवे शतक झळकावले. टी-२० कारकिर्दीतील संजू सॅमसन याचे हे आठवे शतक ठरले. यासह त्याने रोहित शर्माच्या विक्रमाची बरोरीचा डाव साधला. हिटमॅनच्या खात्यातही टी-२० मध्ये ८ शतकांची नोंद आहे.
पुणे: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला
बारामती - अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४४ टक्के मतदान झाले. पोटनिवडणुकीसाठी पवार यांच्यासह २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, विरोधी उमेदवारांमध्ये एकही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार रिंगणात नसल्याने निवडणूक पूर्णपणे एकतर्फी पार पडल्याचे चित्र आहे.
व्यापार: अवघ्या ३ रुपयांचा शेअर ₹३०० पार; ₹१ लाखाचे केले ₹१ कोटी, गुंतवणूकदार मालामाल...
Penny Stock: एकेकाळी पेनी स्टॉक म्हणून ओळखली जाणारी Transformers and Rectifiers (India) Limited कंपनी आता गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरली आहे. गेल्या ६ वर्षांत या कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे.
महाराष्ट्र: "उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी
आता विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला. दुसऱ्यांदा कोंडीत सापडलेल्या काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. आणखी त्याग करावा लागून नये, यासाठी पक्षाचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊ, पण पुढील राज्यसभा निवडणुकीच्या जागेबद्दल आताच निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.
पुणे: तुला पळवून नेईन, तुझे आई-बाबा काय ...; पुण्यात मुलीला धमकी देणारा तरुण अटकेत
पुणे : सोशल मीडियातून ओळख करून घेऊन तरुणींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषत: अल्पवयीन युवतींना आमिष दाखवून पळवून नेल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. एका आईने आपल्या १५ वर्षीय मुलीच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवल्याने पुढील अनर्थ टळल्याचे समोर आले आहे.
व्यापार: सेन्सेक्स ८५२ अंकांनी घसरला, तर निफ्टी २४,१७३.०५ वर बंद; गुंतवणूकदारांचे ₹३ लाख कोटी बुडाले
तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. BSE Sensex आणि Nifty 50 दोन्ही निर्देशांक रेड झोनमध्ये बंद झाले. आजचे बंद दर सेन्सेक्स ८५२.४९ अंकांनी (१.०९%) घसरून ७७,६६४.०० वर आला, तर निफ्टी २०५.०५ अंकांनी (०.८४%) घसरून २४,१७३.०५ वर बंद झाला. आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती सुमारे ₹३ लाख कोटींनी कमी झाली आहे.
हिंगोली: हिंगोली अपघात: वसमतजवळ दोन ठार, दोन गंभीर जखमी
वसमत, हिंगोली येथे तेलगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. नितीन नरवाडे आणि सिराज शेख यांचा मृत्यू झाला. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले. पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्यापार: MSME vs Startup: कमी गुंतवणुकीत अधिक नफा कमावण्यासाठी कोणते मॉडेल योग्य? जाणून घ्या
आजच्या काळात अनेक तरुण नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडे वळत आहेत. मात्र व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठा प्रश्न पडतो की, MSME सुरू करायचा की, Startup? दोन्ही पर्याय आकर्षक असले तरी त्यांची कार्यपद्धती, जोखीम आणि नफ्याच्या शक्यता वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठी या दोन्ही मॉडेल्समधील फरक समजून घेणे गरजेचे ठरत आहे.
व्यापार: लग्नसराईत ग्राहकांना दिलासा; चांदी ₹४,५०० नी घसरली, जाणून घ्या १८-२४ कॅरेट सोन्याचे ताजे दर...
Gold Silver Rate 23 April: लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवण्यात आली आहे. गुरुवार, २३ एप्रिल रोजी सोन्याचा भाव ९०० रुपयांपेक्षा अधिक घसरला, तर चांदीत तब्बल ४,७४५ रुपयांची घट झाली.
व्यापार: भारत जगातील सहावा श्रीमंत देश; सर्वाधिक अल्ट्रा-रिच कुठे?
भारतातील श्रीमंतांची संख्या वेगाने वाढत असून, अल्ट्रा-रिच लोकसंख्येच्या बाबतीत भारत आता जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आर्थिक विकास, तंत्रज्ञान क्षेत्र आणि गुंतवणुकीच्या वाढत्या संधींमुळे देशातील संपत्तीत सातत्यानं भर पडत आहे.