Gold Silver Rate 23 April: लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवण्यात आली आहे. गुरुवार, २३ एप्रिल रोजी सोन्याचा भाव ९०० रुपयांपेक्षा अधिक घसरला, तर चांदीत तब्बल ४,७४५ रुपयांची घट झाली.
आजचे ताजे दर
India Bullion and Jewellers Association (IBJA) च्या माहितीनुसार...
२४ कॅरेट सोने: १० ग्रॅमसाठी ₹१,५१,१८९ (₹९२७ घसरण)
चांदी: १ किलोसाठी ₹२,४३,९३७
२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर
२२ कॅरेट सोने: ₹१,३८,४८९ (₹८४९ घसरण) – GST शिवाय, ₹१,४२,६४३ – GST सहित
१८ कॅरेट सोने: ₹१,१३,३९२ (₹६९५ घसरण) – GST शिवाय, ₹१,१६,७९३ – GST सहित
इतर कॅरेटचे दर
२३ कॅरेट सोने: ₹१,५०,५८४ (₹९२३ घसरण)
१४ कॅरेट सोने: ₹८८,४४६ (₹५४२ घसरण)
(टीप: IBJA दर दिवसातून दोन वेळा, दुपारी आणि संध्याकाळी, जाहीर करते. हे दर दुपारच्या सुमाराचे आहेत.)
ऑल टाइम हाईपासून मोठी घसरण
सोने आपल्या उच्चांक ₹१,७६,१२१ पासून ₹२४,९३२ नी स्वस्त तर, चांदीत उच्चांकापासून ₹१,४१,९९६ ची घट झाली आहे. दरम्यान, युद्धकालीन परिस्थितीत सोने आतापर्यंत ₹७,९०८ ने घसरले आहे, तर चांदी ₹२३,९६३ नी खाली आली आहे. तज्ज्ञांच्या मते, मे महिन्यापर्यंत ऊर्जा आणि शेअर बाजारातील उत्साह कमी झाल्यानंतर पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे (सोने-चांदी) कल वाढू शकतो. त्यामुळे येत्या काळात दर पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(टीप- हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
