शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

गाणगापूरला देवदर्शनाला गेलेला जुंगटीचा युवक नदीत बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 2:54 PM

सातारा तालुक्यातील जुंगटी येथील पांडुरंग भागुजी कोकरे हा युवक तीन दिवसांपूर्वी काही सहकाऱ्यांसमवेत गाणगापूरला देवदर्शनाला गेला होता. गाणगापूर येथील नदीवर तो बुधवारी सकाळी अंघोळीला गेला असता बुडाला. त्याचा शोध सुरू आहे.

ठळक मुद्देगाणगापूरला देवदर्शनाला गेलेला जुंगटीचा युवक नदीत बुडाला ग्रामस्थांसह नातलग गाणगापूरकडे

बामणोली : सातारा तालुक्यातील जुंगटी येथील पांडुरंग भागुजी कोकरे हा युवक तीन दिवसांपूर्वी काही सहकाऱ्यांसमवेत गाणगापूरला देवदर्शनाला गेला होता. गाणगापूर येथील नदीवर तो बुधवारी सकाळी अंघोळीला गेला असता बुडाला. त्याचा शोध सुरू आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, जुंगटी या गावातील पांडुरंग भागुजी कोकरे (वय ३२) हा मुंबईमध्ये टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असत. तो सोमवारी त्यांच्या आठ ते दहा सहकाऱ्यांसमवेत मुंबईहून गाणगापूरला देवदर्शनाला गेला होता. मंगळवारी देवदर्शन करून तो बुधवारी सायंकाळी माघारी परतणार होता. तो बुधवारी सकाळी आठच्या सुमारास सहकाऱ्यांसमवेत गाणगापुरातील तीर्थस्थळाशेजारील नदीत अंघोळीला गेला.

तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला असल्याची माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली. या घटनेची नोंद तेथील पोलीस ठाण्यात झाली असून, अद्याप तपास लागला नाही. तेथील तरुण व प्रशासनाने शोधकार्य सुरूच ठेवले आहे. या घटनेची महिती कळताच ग्रामस्थांसह नातलगांनी गाणगापूरकडे धाव घेतली. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर