शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फडतरेंचे खोंड ठरले ‘यमाई चॅम्पियन’

By admin | Updated: January 16, 2015 23:47 IST

औंध यात्रा: जनावर प्रदर्शनात शंभर स्पर्धकांतून बाजी मारली

औंध : औंध येथील श्री यमाईदेवी यात्रेनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती व औंध ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या जनावरांच्या प्रदर्शनामध्ये ‘श्री यमाई यात्रा चॅम्पियन’ चा किताब फडतरवाडीच्या उत्तम फडतरे यांच्या खोंडाने पटकविला. प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक पी. के. काळे, बबनराव कदम, उपसरपंच राजेंद्र माने, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस हणमंत शिंदे, दीपक नलवडे, वसंतराव गोसावी, अलिम मोदी, प्रभारी सचिव नामदेव देशमुख, निरीक्षक अशोक पवार, पर्यवेक्षक सुमंत सर्वगोड, सांख्यिकी अधिकारी जितेंद चव्हाण आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.जनावरांच्या प्रदर्शनातील अन्य विजेते गटानुसार याप्रमाणे - आदत गाय एक वर्षांचे आत पहिले तीन क्रमांक नारायण जाधव जायगाव, बाबासो लकडे, नांदोशी, कालिदास जाधव जायगाव, आदत गाय एक वर्षांचे वरील पहिले तीन क्रमांक अनुक्रमे- अक्षय फडतरे लांडेवाडी, मिलिंद कदम गोरेगाव वांगी, मोहन गोडसे महूद, संभाजी कदम गोरेगाव.दोन दाती गाय - धनराज देशमुख कुरोली, देवदास गायकवाड नांदोशी, अरुण इंगळे औंध यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविले. चार दाती गाय - पहिले तीन क्रमांक अनुक्रमे मोहसीन मुलाणी बुध, संदीप इंगळे औंध, युवराज गायकवाड आर्वी. जुळीक गाय - पहिले तीन क्रमांक स्वप्नील फडतरे बुध, शहाजी घार्गे येळीव, श्रीरंग भोसले खातगुण, बाळू मदने. आदत खोंड - (वर्षाचे वरील) पहिले तीन क्रमांक प्रभाकर फडतरे, शेखर पवार, शांताराम कुंभार, औंध. दोन दाती खोंड - पहिले तीन क्रमांक उत्तम फडतरे फडतरवाडी, शब्बीर मुलाणी बुध, भरत पवार वांझोळी, संभाजी येवले त्रिमली, नेताजी माने वरुड, अशोक सूर्यवंशी लांडेवाडी.चारदाती खोंड - पहिले तीन क्रमांक रामचंद्र इंगळे औंध, बाबू इंगळे औंध, मनोज चव्हाण पुसेसावळी, जुळीक खोंड - महादेव शिंदे कान्हरवाडी, अक्षय गिरी सातारा यांनी विजेतेपद पटकाविले.
जनावरांच्या प्रदर्शनामध्ये एकूण १०० जनावरांनी सहभाग घेतला.परीक्षण पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. यु. डी. मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सावंत आदींच्या पथकाने परिश्रम घेतले. नामदेव देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)े