कला गोविंद क्रेडिट सोसायटीचे कार्य समाजहिताचे : देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:40 IST2021-01-13T05:40:42+5:302021-01-13T05:40:42+5:30

साकुर्डी पेठ, (ता. कऱ्हाड) येथील कला गोविंद क्रेडिट को- ऑप. सोसायटीच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद ...

Work of Kala Govind Credit Society for social welfare: Desai | कला गोविंद क्रेडिट सोसायटीचे कार्य समाजहिताचे : देसाई

कला गोविंद क्रेडिट सोसायटीचे कार्य समाजहिताचे : देसाई

साकुर्डी पेठ, (ता. कऱ्हाड) येथील कला गोविंद क्रेडिट को- ऑप. सोसायटीच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, संस्थापक सचिन पवार, अध्यक्ष संदीप पवार, उपाध्यक्ष एकनाथ जाधव, बाजार समितीचे माजी सदस्य प्रकाश पाटील, तुकाराम काटकर, सरपंच तुकाराम डुबल, नवनाथ पालेकर, लेखापरीक्षक संपत शिंदे, शाखा व्यवस्थापक मंगल कुंभार, आप्पासाहेब पाटील, प्रणाली पाटील, सूरज तांबोळी आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील म्हणाले, सुपने-तांबवे भागात कला गोविंद सोसायटीने पहिल्याचवर्षी अत्यंत चांगल्या ठेवी मिळवून विश्वास संपादन केला आहे. यापुढील काळातही या संस्थेने समाजहित जपावे. तसेच गरजूंना योग्य पध्दतीने मदत करून काटेकोरपणाही जपावा.

प्रास्ताविक सचिन पवार यांनी केले. स्वागत संदीप पवार यांनी केले. आभार प्रकाश पाटील यांनी मानले. (वा. प्र.)

फोटो : १०केआरडी०१

कॅप्शन :

साकुर्डी पेठ, (ता. कऱ्हाड) येथे कला गोविंद क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या कार्यक्रमात गृहराज्य व वित्त, नियोजनमंत्री शंभूराज देसाई यांचे स्वागत संस्थापक सचिन पवार यांनी केले. यावेळी संदीप पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील उपस्थित होते.

Web Title: Work of Kala Govind Credit Society for social welfare: Desai