शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे काम सुरू... जलवाहिन्या मात्र उद्ध्वस्त

By admin | Updated: October 31, 2015 00:09 IST

पाचवडला साथ रोगांची भीती : ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा

 पाचवड : पाचवड, ता. वाई येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या सहापदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. त्यातच महामार्ग अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गावास पाणीपुरवठा करणारी जलवाहिन्या ठिकठिकाणी उद्ध्वस्त झाल्या आहे. पाचवड फाट्यावरील व गावामधील काही भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीने ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे साथरोगाची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणात पाचवड गावास पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन ठिकठिकाणी तुटली आहे. या पाईपलाइनचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या होत्या. मात्र, ग्रामपंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून महामार्गाचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पाचवड गाव व फाट्याला होत असलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गेल्या एक महिन्यापासून पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावीत लागत आहे. तर काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे या परिसरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता असून, येथील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका पोहचणार आहे. (वार्ताहर) सहापदरीकरणाचे काम बंद पाडणार... पाचवड ग्रामपंचायतीने या गोष्टीची गंभीरपणे दखल घेऊन याबाबतचे लेखी पत्र संबंधित राष्ट्रीय महामार्ग अधिकऱ्यांना दिले आहे. पाचवड ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका पोहोचल्यास त्यास पूर्णपणे संबंधित अधिकारी जबाबदार राहणार असल्याचेही कळविले आहे. पाईपलाईनचे काम त्वरित करून द्यावे, अन्यथा सहापदरीकरणाचे काम बंद पाडण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.