शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST

सातारा : मतदान प्रक्रियेत महिला आणि पुरुषांना समान संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी ...

सातारा : मतदान प्रक्रियेत महिला आणि पुरुषांना समान संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी जागतिक महिला दिनानिमित्त मतदार नोंदणी कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचा सत्कार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर आदी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाचा मतदान प्रक्रियेत महिलांचा मोठा सहभाग रहावा यावर भर राहिला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी मतदार नोंदणी कामात चांगले काम केले आहे त्यांचे अभिनंदन करुन प्रत्येकाला मतदानाचा स्वतंत्र अधिकार दिला आहे . मतदार नोंदणी करताना मतदानाचे महत्त्वही पटवून सांगावे, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जागतिक महिला दिनाच्या महिलांना शुभेच्छा दिल्या.

महिला व पुरुष असा भेद न करता प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. महिला मतदारांनी मतदान नोंदणी करुन मतदान करणे महत्त्वाचे असून वर्षातून १ मतदार यादी प्रसिद्ध होते. या मतदार यादीत आपली नावे आहेत का याची खात्री करावी. लोकशाहीचा आत्मा हा मतदार असून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे प्रास्ताविकात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सांगितले.

या कार्यक्रमास महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.

फोटो ओळ : सातारा जिल्हा नियोजन भवनामध्ये जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्‍ते महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.