शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी कोरोनाविषयी जागृत राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:12 IST

वाई : मागील काही महिन्यांत कमी झालेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. नागरिकांमध्ये नियम पाळण्यामध्ये ढिलाई होत आहे. ...

वाई : मागील काही महिन्यांत कमी झालेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. नागरिकांमध्ये नियम पाळण्यामध्ये ढिलाई होत आहे. यामुळे धोका वाढला असून, नागरिकांनी प्रतिबंधक उपाय काटेकोर पाळावेत, असे आवाहन भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले यांनी केले.

नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, महिला मोर्चा अध्यक्ष शुभदा नागपूरकर, नगरसेविका वासंती ढेकाने, नगरसेविका रूपाली वनारसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय जनता पार्टी वाई शहराच्या वतीने नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीचे तसेच लोकोपयुक्त विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणजे महिलांच्या वतीने दरवर्षी साजरा केला जाणारा हळदीकुंकू कार्यक्रम.

या वर्षी रथसप्तमीच्या शुभ मुहूर्तावर हा कार्यक्रम एका वेगळ्या व अनोख्या पद्धतीने साजरा केला गेला. वाई शहरामध्ये रोज भरणाऱ्या बाजारामध्ये अनेक महिला भगिनी आजूबाजूच्या गावांमधून तरकारी विक्री करण्यासाठी वाईमध्ये येतात. त्यांच्याबरोबर अनेकदा लहान मुले-मुली असतात. सध्या चालू असणाऱ्या कोरोनाच्या आपत्कालीन काळामध्ये मास्कची उपयुक्तता आपण सर्व जण जाणतोच. हीच गोष्ट लक्षात घेऊन शुक्रवारी झालेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमामध्ये भाजप महिलांनी या तरकारी विक्रीसाठी बसलेल्या महिलांना हळदी-कुंकू करून सध्याच्या आपत्कालीन काळामध्ये अत्यंत उपयोगी असणारे मास्कचे वाण म्हणून वाटप केले. तसेच महिलांसाठी सुरू केलेल्या विविध उपयुक्त योजनांचे पत्रकही दिले. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेविका मीनल इनामदार, जिल्हा महिला सरचिटणीस ज्योती गांधी, वाई शहर भाजप सरचिटणीस मनीषा घैसास, सरचिटणीस तनुजा इनामदार, उपाध्यक्षा शश्मिता जैन, स्वाती केंडे, महिला मोर्चा सरचिटणीस सुषमा शिंदे, महिला मोर्चा उपाध्यक्ष रूपाली गव्हाणे, विनया सुरत्राण, महिला चिटणीस भारती कुलकर्णी, हर्षदा रानडे, राधा फुले आदी उपस्थित होत्या.