महिलांनी सक्षम होऊन सर्व क्षेत्रांत भरारी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST2021-03-09T04:42:23+5:302021-03-09T04:42:23+5:30

वाई : सध्या महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. आधुनिक युगातील कौश्यल्य आत्मसात करून मार्गक्रमण केल्यास प्रत्येक क्षेत्रात ठसा उमठवू ...

Women should be able to excel in all fields | महिलांनी सक्षम होऊन सर्व क्षेत्रांत भरारी घ्यावी

महिलांनी सक्षम होऊन सर्व क्षेत्रांत भरारी घ्यावी

वाई : सध्या महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. आधुनिक युगातील कौश्यल्य आत्मसात करून मार्गक्रमण केल्यास प्रत्येक क्षेत्रात ठसा उमठवू शकता. महिलांनी सक्षम होऊन सर्व क्षेत्रात भरारी घ्यावी,’ असे प्रतिपादन सरपंच परिषदच्या जिल्हा कार्याध्यक्षा अल्पना यादव यांनी केले.

वाई येथील त. ल. जोशी विद्यालयात महिला शिक्षकांचा गौरव करून महिला दिन साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका जबिन शेख उपस्थित होत्या.

यादव म्हणाल्या, ‘आज महिला सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांचा सत्कार हा मातृत्वाचा आणि कर्तृवाचा सत्कार असतो. मुलींचा जन्मदर घटणार नाही याची काळजी घेणे ही सरकारची नव्हे, तर सामाजिक जबाबदारी आहे.

अध्यक्षीय भाषणात उपमुख्याध्यापिका जबीन शेख यांनी कर्तृत्ववान महिलांची माहिती विद्यार्थ्यांना दिली व त्यांच्या आदर्शावर मार्गक्रमण केल्यास जीवनात हमखास यश मिळेल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुनील मोरे, पर्यवेक्षिका रश्मी बागल यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे समृद्धी यादव यांनी सूत्रसंचालन केले. राजेश भोज यांनी प्रास्ताविक केले. संपत कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Women should be able to excel in all fields