शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा दागिन्यांसाठी दगडाने ठेचून खून,एकजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 15:57 IST

शेतात काम करत असताना दगडाने ठेचून सुमन शंकर शेलार (वय ४५ रा.माळवाडी, ता. कऱ्हाड ) यांचा गुरुवारी भर दुपारी निर्घृण खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.

ठळक मुद्देमहिलेचा दागिन्यांसाठी दगडाने ठेचून खूनमाळवाडीतील घटनेने खळबळ : पोलिसांकडून तपास सुरू

मसूर /सातारा : शेतात काम करत असताना दगडाने ठेचून सुमन शंकर शेलार (वय ४५ रा.माळवाडी, ता. कऱ्हाड ) यांचा गुरुवारी भर दुपारी निर्घृण खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.माळवाडी, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीतील देशपांडे अकराव नावच्या आपल्या शिवारात सुमन शेलार या गुरुवारी दुपारी काम करत होत्या. त्यावेळी चोरीच्या उद्ेशाने अज्ञाताने त्यांचा दगडाने ठेचून खून केला होता. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञाताने काढून घेतले होते.

त्यानंतर   हल्लेखोरांने मृतदेह फरफटत नेऊन झाडाला साडी व सुरुंगाच्या वायरने बांधून ठेवला होता. कऱ्हाड  पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून एका संशयिताला शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. संबंधितांवर या खुनाचा संशय असून, त्यानेच हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे.

शेतात काम करत असताना अज्ञाताने एका महिलेचा केवळ दागिन्यांच्या हव्यासापोटी दगडाने ठेचून निर्घृण खून केला. ही खळबळजनक घटना कऱ्हाड तालुक्यातील माळवाडी येथे गुरुवारी भरदुपारी तीनच्या सुमारास घडली.सुमन शंकर शेलार (वय ४५ रा.माळवाडी, ता. कऱ्हाड ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.माळवाडी गावच्या हद्दीतील देशपांडे अकराव नावच्या आपल्या शिवारात सुमन शेलार या काम करत होत्या. त्यावेळी चोरीच्या उद्ेशाने संबंधिताने त्यांचा दगडाने ठेचून खून केला. त्यांच्या गळ्यातील गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञाताने काढून घेतले. त्यानंतर हल्लेखोरांने मृतदेह फरफटत नेऊन ओढ्यातील पाण्यात झाडाला साडी व सुरुंगाच्या वायरने बांधून ठेवला.

त्यानंतर संबंधिताने तेथून पलायन केले. बराचवेळ झाला तरी त्या घरी आल्या नाहीत म्हणून त्यांच्या मोबाईलवर घरातल्यांनी फोन केला. मात्र, फोन बंद होता. त्यामुळे घरातले लोक शेतात गेले असता हा प्रकार उघड झाला.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी भेट देऊन तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कर्णफुलांसाठी कानही तोडले...हल्लेखोराने सुमन शेलार यांच्या दोन्ही कानातील दागिने काढण्याच्या हेतूने दगडाने ठेचून दोन्ही कान तोडले. परंतु कानातले दागिने सोन्याचे नसल्याचे लक्षात येताच कानातील बनावट दागिने त्याठिकाणी टाकले. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड सापडला. तसेच पिशवी, मोबाईल बॅटरी, सिमकार्ड कार्डही सापडले आहे. 

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसर