शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पवन सोळवंडे खूनप्रकरण : कऱ्हाडातील जे बाबा टोळीला मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 15:14 IST

पवन सोळवंडे खून प्रकरणातील जे बाबा ऊर्फ जुनेद शेख टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. या टोळीत २१ जणांचा समावेश असून, या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपवन सोळवंडे खूनप्रकरण : कऱ्हाडातील जे बाबा टोळीला मोक्का२१ जणांवर कारवाई; गुन्हेगारी टोळ्यांना हादरा

कऱ्हाड : पवन सोळवंडे खून प्रकरणातील जे बाबा ऊर्फ जुनेद शेख टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. या टोळीत २१ जणांचा समावेश असून, या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.कऱ्हाडात २१ आॅगस्ट रोजी रात्री बेछूट गोळीबार करून पवन सोळवंडे या गुंडाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी ह्यजे बाबाह्ण टोळीचा प्रमुख जुनेद फारूख शेख (वय ३०, रा. शिवाजीनगर, मलकापूर), समीर इस्माईल मुजावर (३०, सर्वोदय कॉलनी, आगाशिवनगर), शिवराज सुरेश इंगवले (२४, लाहोटीनगर, मलकापूर), अल्ताफ राजेखान पठाण (५०), निहाल अल्ताफ पठाण (२४, दोघेही रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड ), मजहर बद्रुद्दीन पिरजादे (२८, अहिल्यानगर, मलकापूर), हैदर महिबूब मुल्ला (२६, मुजावर कॉलनी, शनिवार पेठ, कऱ्हाड ), पितांबर ऊर्फ पप्पू विश्वास काटे (२६, बैलबाजार रोड, मलकापूर), सिकंदर बाबू शेख (२९, रा. विंग, ता. कऱ्हाड ), प्रमोद ऊर्फ अप्पा तुकाराम जाधव (३७, रा. साईनगर, कऱ्हाड ), निरज आनंदराव पानके (२६, कोयना वसाहत, कऱ्हाड ), अक्षय ऊर्फ महादेव संजय मोकाशी (२५, रा. बागल वस्ती, आगाशिवनगर), दिवाकर ऊर्फ गोंद्या बाबूराव गाडे (२७, रा. साईनगर, मलकापूर), विजय बिरू पुजारी (२०, रा. बैलबाजार रोड, मलकापूर), सोहेल राजुभाई मुलाणी (२८, ज्ञानदीप कॉलनी, मलकापूर), आकीब लियाकत पठाण (रा. मलकापूर), अक्षय साहेबराव धुमाळ (रा. मलकापूर), सॅम ऊर्फ समीर नुरमहम्मद मोमीन (रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड ), अल्फाद कासीम शेख (रा. मलकापूर), आयुब बेली (रा. मलकापूर) या २१ जणांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना पाठविला होता.

अधीक्षक सातपुते यांनी हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सूरज वारके यांना पाठविला. महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, जे बाबा टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर