शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

‘रब्बी’साठी फक्त दोन वेळा पाणी!

By admin | Updated: October 30, 2015 23:30 IST

विश्रामगृहात बैठक : ‘कृष्णा’काठच्या पाण्याचा प्रश्न चर्चेला

सातारा : ‘धोम-बलकवडी’ प्रकल्पातून रब्बीसाठी चार रोटेशनमध्ये पाणी सोटण्याची तरतूद असली तरी, यंदा पाणी टंचाईमुळे केवळ दोनच रोटेशन करण्याचा निर्णय शुक्रवारी विश्रामगृहातील बैठकीत घेण्यात आला. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या बैठकीत पाणीवाटपाबाबत अनेक विषयांवर गंभीर चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची उपस्थिती होती. धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे वाई, कोरेगाव, फलटण या तिन्ही तालुक्यांत चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मकरंद पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना लोकभावना सांगितली. ‘धरणांत अत्यल्प पाणीसाठा राहिला असल्याने चिंतेचे वातावरण असल्याने धोम-बलकवडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे अत्यंत काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. कृष्णा नदीवर बहुतांश गावांच्या पाणी योजना आहेत. नोव्हेंबर महिन्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याने जानेवारीपासून असंतोषाचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे. धोम धरणात पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा ठेवून पाटात सोडलेले पाणी योग्य कारणासाठी वापरले जाणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवून पाणी सोडावे.’ जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनीही पोटपाटांच्या गळत्या काढून घेण्याच्या सूचना केल्या. पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)