शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वांझोळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

पुसेसावळी : राजकीय धुळवड, गटतट बाजूला ठेवून वांझोळी ग्रामस्थांनी पुन्हा ऐक्याची वज्रमुठ आवळली आणि ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणुकीची गुढी उभी ...

पुसेसावळी : राजकीय धुळवड, गटतट बाजूला ठेवून वांझोळी ग्रामस्थांनी पुन्हा ऐक्याची वज्रमुठ आवळली आणि ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणुकीची गुढी उभी केली आहे. ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सार्वजनिक उत्सवात वांझोळी ग्रामस्थांनी एकी दाखवली आहे.

निवडणुकीमुळे गावातील वातावरण दूषित होण्यापेक्षा सर्वांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कंबर कसली आणि सर्वानुमते सात जागांसाठी सातच अर्ज भरायचे निश्चित झाले. त्यानुसार आरक्षनिहाय सात अर्ज दाखल करून बिनविरोध निवडणुकीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. किसन मगर, बाळू मोटे, तन्वीर वाघमारे, राजश्री मगर, सुनीता मगर, सविता मगर, अनुसया माने यांची पुढील पाच वर्षांसाठी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी साधुनाना मगर, आप्पा मगर, चंद्रकांत मगर, बाळासाहेब मगर, भरत जगताप, पोलीसपाटील संभाजी माळी, आण्णा मगर, अरविंद मगर, सुरेशशेठ सूर्यवंशी, संजय निकम, तानाजी मगर, आकाराम मगर, सुरेश मगर, भरत डुबल, संभाजी मगर, गणेश मगर, राजेंद्र मगर, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

नवनिर्वाचित सदस्यांचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, धैर्यशील कदम, जितेंद्र पवार, मानसिंग माळवे, सुरेशबापू पाटील, संतोष घार्गे, सी. एम. पाटील यांनी कौतुक केले आहे.

फोटो ओळ :

०७पुसेसावळी

वांझोळी ग्रामपंचायती बिनविरोध निवड झालेले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य.