शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विश्वजीत घोडके यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:52 IST

खटाव : पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांची पुणे येथे पदोन्नती झाल्यामुळे त्यांचा खटाव ग्रामपंचायत व ...

खटाव : पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांची पुणे येथे पदोन्नती झाल्यामुळे त्यांचा खटाव ग्रामपंचायत व सावित्रीबाई फुले महिला पतसंस्था यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास सरपंच नंदकुमार वायदंडे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, उपसरपंच अमर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य यांच्याहस्ते, तर सावित्रीबाई फुले पतसंस्थेचे चेअरमन नम्रता भोसले, व्यवस्थापक शबाना काझी यांनी सत्कार केला.

घोडके म्हणाले, ‘खटाव-माण तालुक्यांतून प्रशासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी आले आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वारसा असणाऱ्या खटाव तालुक्यातील विशेषतः पुसेगावसारख्या पुण्यनगरीत काम करण्याची संधी मिळाली आहे. खटावसारख्या राजकीय संवेदनशील असणाऱ्या गावात काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना एक स्वतंत्र विचार व वेगळी पॉलिसी राबवत असताना गावातील दोन संघटनांना विश्वासात घेऊन त्यांच्यात समन्वय साधून प्रत्येक गोष्ट करत गेलो. यामुळे पुसेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये खटाव गावचे उदाहरण देऊन प्रत्येक प्रसंगातून मार्ग काढून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केलाच. त्याचबरोबर पुसेगाव पोलीस स्टेशनचे नाव राज्यात नेता आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य उत्तम बोर्गे, निवास पवार, राहुल जमदाडे, दीपक घाडगे, महेश घाडगे, वैभव वाघ, रमेश शिंदे, बबन शिंदे, मुसा काझी उपस्थित होते.

२६खटाव-पुसेगाव-पोलीस

खटाव ग्रामपंचायतीच्यावतीने सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांचा सत्कार सरपंच नंदकुमार वायदंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राहुल पाटील, उपसरपंच अमर देशमुख उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)