Video - खळबळजनक! सोने, चांदी व रोख रक्कम असलेली असलेली बॅग चोरट्यांनी केली लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 16:01 IST2026-02-23T16:00:40+5:302026-02-23T16:01:51+5:30
मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने सोन्या-चांदीसह रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज असलेली सोनाराची बॅग गायब केली. यामुळे एकच खळबळ उडाली.

Video - खळबळजनक! सोने, चांदी व रोख रक्कम असलेली असलेली बॅग चोरट्यांनी केली लंपास
उंब्रज - मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने सोन्या-चांदीसह रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज असलेली सोनाराची बॅग गायब केली. यामुळे एकच खळबळ उडाली.
चोरे रोड लगत गणेश यादव यांचे श्री वागदेवी ज्वेलर्स हे दुकान आहे सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान ते आपल्या मोटरसायकलवरून दुकानाजवळ आले. मोटर सायकलला बॅग अडकून ते दुकानाचे कुलूप काढत होते. तेव्हा त्यांना कुलपाच्या होलमध्ये मेन सदृश्य पदार्थ भरलेला आढळून आला.
कुलूप उघडताना त्यांना उशीर होत होता. याच दरम्यान मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने आपला डाव साधला. ६ तोळं सोनं, चांदी, अडीच लाख रुपये रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज असलेली बॅग गायब केली.
उंब्रज:- मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने सोन्या-चांदीसह रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज असलेली सोनाराची बॅग गायब केली. यामुळे एकच खळबळ उडाली. pic.twitter.com/nVf20Iozsv
— Lokmat (@lokmat) February 23, 2026