शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय पदवीधर पिकवतोय विदेशी भाज्या

By admin | Updated: October 6, 2015 00:42 IST

ही रानवाट वेगळी..

पारंपरिक शेतीला बगल देऊन आधुनिक शेतीची कास धरत शेतीमध्ये यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा ऐकत आपणही आपल्या शेतीत काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीने पाचवड, ता. वाई येथील नितीन शेवाळे हा पदवीधर युवक शेती क्षेत्रामध्ये आला. सर्वसाधारण पंधरा वर्षांपूर्वी पशुवैद्यकीय पदवी घेऊनही शेतीमध्ये नशीब आजमवण्यासाठी झेपावलेला पाचवडमधील तो एकमेव पदवीधर शेतकरी. आंतरराष्ट्रीय भाज्यांचे उत्पादन घेऊन एक यशस्वी शेतकरी म्हणून पाचवड भागात प्रसिद्धीस आलेल्या या अवलियाची ही यशोगाथा... आजूबाजूची पारंपरिक शेती बघत मोठा झालेला नितीनला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. शालेय शिक्षणानंतर पशुवैद्यकीय पदवी मिळविली. काहीकाळ पाचवड व आसपासच्या भागामध्ये पशुवैद्यक म्हणून काम सुरू केले. हे करत असताना वेगवेगळ्या विचारांच्या शेतकऱ्यांशी संबंध येत गेला. प्रत्येक शेतकरी शेतीविषयी आपली व्यथा मांडीत होता. शेतकऱ्यांच्या या व्यथांमागचे कारण नितीनच्या लक्षात आले. शेतकरी करत असलेला पारंपारिक शेती, बाजारपेठेतील माहितीची उणीव व शेतीमधील आधुनिकतेचा अभाव या कारणांचा शोध लागल्यावर नितीनने पशुवैद्यकाचे काम थांबविले. पशुवैद्यकीय कामे न करता आपण उच्च दर्जाची शेती करायची, हे मनाशी ठरवलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादित केल्या जाणाऱ्या भाज्या आपण आपल्या शेतामध्ये घेण्याचे नितीनने ठरवले. पुणे येथील एका शेती कंपनीमध्ये काम करत असणाऱ्या बंधूचे मार्गदर्शन घेण्याचे ठरवून थेट पुणे गाठले. त्याठिकाणी ब्रोकोली, सॅलरी, चायना कॅबेज, लेटूस आईसबर्ग व अन्य काही आंतरराष्ट्रीय भाज्यांच्या लागवडी, संगोपन व बाजारपेठेविषयी सविस्तर माहिती घेतली. आपल्या गावाकडची जमीन या भाज्यांच्या लागवडीसाठी योग्य असल्याची माहिती घेतल्यानंतरच या भाज्यांचीच शेती करण्याचे नितीनने ठरवले. वाई तालुक्यातील पाचवड गावाचा शेतीचा भाग म्हणजे मोठा ऊसउत्पादक म्हणून ओळख आहे. अशा ठिकाणी या भाज्यांची लागवड करताना सुरुवातीला आपण चूक करतो की काय, अशी भावना नितीनच्या मनात आली होती. पाचवड विकाससेवा सोसायटीत कार्यरत असणारे नतीनचे बंधू आदिनाथ यांनी आधार दिला. बदल महत्वाचा हे पटल्यानंतर ‘ब्रोकोली’ भाजी लागवडीकरिता निवडली. नितीनची ही वाटचाल युवकांसाठी प्रेरणादायकच आहे.महेंद्र गायकवाड