शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना प्रवासी वाहतूक; दोन ट्रॅव्हल्स चालकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

नागठाणे : विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर बोरगाव पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई दरम्यान दोन्ही ट्रॅव्हल्सवर प्रत्येकी दहा हजारांची ...

नागठाणे : विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर बोरगाव पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई दरम्यान दोन्ही ट्रॅव्हल्सवर प्रत्येकी दहा हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, ३१ मे रोजी सकाळी ११.३०च्या सुमारास बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ हे काही कर्मचाऱ्यांसोबत पोलीस स्थानकाच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मौजे अतीत (ता. सातारा) गावच्या हद्दीतील माजगाव फाट्यावरील हॉटेल राजमुद्रासमोर तहसीलदार नावाची ट्रॅव्हल्स (एमएच ०९ सीव्ही १८९९) तसेच शेफाली नावाची ट्रॅव्हल्स (एमएच ०९ सीव्ही ७८६) अशा दोन ट्रॅव्हल्स उभ्या असलेल्या दिसल्या. तसेच त्यातून काही प्रवासी खाली उतरून हॉटेलमधून जेवणाचे पार्सल घेत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशानुसार सर्व हॉटेल आस्थापना बंद ठेवण्यात आल्या असून, अत्यावश्यक कारणाशिवाय वाहतुकीस जिल्हाबंदी असतानाही या दोन्ही ट्रॅव्हल्समधून साधारण ३० ते ४० प्रवासी हे कोल्हापूर ते मुंबई तसेच मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास करत होते. त्यांच्याकडे ई-पास तसेच कोविड चाचणी अहवालाची मागणी केली असता, त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे मिळूली नाहीत. त्यानंतर ट्रॅव्हल्स चालकांकडे अहवालाची तसेच प्रवासी वाहतुकीच्या परवानगीची कागदपत्र मागितली असता, त्यांच्याकडेही कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तहसीलदार ट्रॅव्हल्सवरील चालक अजित ज्ञानदेव कांबळे (रा. इंदिरानगर, सातारा) व शेफाली ट्रॅव्हल्सचा चालक किशोर गजानन ढमगणे (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांच्यावर प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सागर वाघ तसेच हवालदार धनंजय जाधव, विशाल जाधव, विजय साळुंखे यांनी केली.