शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उंडाळकर समर्थकांचे राजीनामे

By admin | Updated: September 26, 2014 23:30 IST

उंडाळकर आज अर्ज दाखल करणार : पक्ष, चिन्ह मात्र गुलदस्त्यात

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आह़े़ म्हणूनच आम्ही कऱ्हाड दक्षिण तालुका काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामा देत असल्याची माहिती तालुकाध्यक्ष जगन्नाथ माहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली़उंडाळकर समर्थक कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी उपाध्यक्ष मनसूर फकीर, रंगराव थोरात, सचिव राजेंद्र पाटील यांची उपस्थिती होती़मोहिते म्हणाले, ‘काका हाच आमचा पक्ष आहे़ त्यांनी अपक्ष लढायचं की, अन्य कोणत्या पक्षातून, याचा सर्व निर्णय आम्ही त्यांनाच दिला आहे़ त्यामुळे उद्या (शनिवारी) ते अर्ज भरणार आहेत़ एवढेच मी सध्या तुम्हाला सांगू शकतो़’ दिल्लीवरून लादलेल्या माणसांमुळेच काँग्रेसची दक्षिणेत पीछेहाट झाली आहे़ उंडाळकरांची उमेदवारी नाकारणाऱ्यांनी त्याचे कारण देणे गरजेचे आहे़, असे त्यांनी सांगितले़दरम्यान, कऱ्हाड दक्षिणचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनीही आजच काँग्रेस पक्षाकडे राजीनामा पाठविला असून, ते कोणत्या पक्षातून लढणार आहेत, हा निर्णय उद्या स्पष्ट होईल़ दरम्यान, विलासराव पाटील-उंडाळकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत का? याबाबत छेडले असता ही बाब वरिष्ठ पातळीवरील आहे, तेव्हा याबाबत आम्हाला अधिक माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे जगन्नाथ मोहिते यांना यापूर्वीच पदमुक्त करण्यात आले आहे. राजेंद्र चव्हाण यांची काही दिवसांपूर्वीच तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मोहितेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही़ - आमदार आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेसघड्याळ कुणाच्या हातात ?आमदार विलासराव पाटील-उंडाळकर हे दक्षिणेतून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी चर्चा आज, शुक्रवारी दिवसभर सुरू आहे़ त्याचबरोबर खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आज दक्षिणेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेही राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे खात्रीशीर समजते. याशिवाय पांडुरंग चव्हाण व नगरसेवक सुभाष पाटील यांनीही राष्ट्रवादीकडे यापूर्वीच उमेदवारी मागितली आहे.