शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेच्या संवर्धनासाठी अविरत प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:14 IST

मराठी ही आपली मातृभाषा आहे. या मातृभाषेचा गोडवा इतका आहे की, याची सर दुसऱ्या कोणत्याच भाषेला येणार नाही. सातारा ...

मराठी ही आपली मातृभाषा आहे. या मातृभाषेचा गोडवा इतका आहे की, याची सर दुसऱ्या कोणत्याच भाषेला येणार नाही. सातारा जिल्ह्यातील अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या मातृभाषेची महती सातासमुद्रापार पोहोचविली अन्‌ अजूनही पोहोचवित आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय मातृभाषा संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अविरत प्रयत्न करीत आहे. मराठी चर्चासत्रापासून ते राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्त विकिपीडिया नोंद लेखन कार्यशाळेपर्यंत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हे महाविद्यालय राबवित आहे.

छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विभाग मराठी अभ्यास केंद्रात मातृभाषा मराठीच्या संवर्धनासाठी मराठी भाषा, साहित्य, समीक्षा, संशोधन व मराठी भाषिक कौशल्याचा विकास या संदर्भाने विविध उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात. याशिवाय शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि मराठी विभागादाद्वारे राष्ट्रीय कथाकथन व काव्यवाचन स्पर्धाचे आयोजन केले जाते. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी हुमणे स्पर्धा, म्हणी संकलन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, कथा लेखन स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, मराठी घोषवाक्य अशा स्पर्धांचे आयोजन करून मातृभाषेला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

याशिवाय भाषिक कौशल्य विकास कार्यशाळा, आम्ही पु. ल. देशपांडे स्टॅंडअप कॉमेडी स्पर्धा भरविल्या जातात. मातृभाषेची महती वाढावी यासाठी पटकथा लेखन कार्यशाळा, कथा निर्मिती व आस्वाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मराठीतून शैक्षणिक लेखन कसे करावे यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले जाते. याचबरोबर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केले जाणारे बंधुता विद्यार्थी–शिक्षक साहित्य संमेलन आज मातृभाषा संवर्धनाची चळवळ अधिक दृढ करीत आहे.

तसेच संगीत विभाग व मराठी विभाग यांच्यावतीने गीत गायन स्पर्धा, वाचन प्रेरणादिन असे उपक्रमही राबविले जातात. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सिद्धी विद्यामंदिर येथे जाऊन मुलांना मराठी गाणी व कला कौशल्य सादरीकरण केले. मातृभाषेचा गोडवा गाणारी ही परंपरा पुढेही कायम ठेवण्यात आली.

(कोट)

आंतरमहाविद्यालयीन मराठी वक्तृत्व स्पर्धा, मराठी भाषा व साहित्य संशोधन : पुनर्विचार व नव्या दिशा हे ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, मराठीतून वक्तृत्व कला विकास आदी कार्यशाळा मातृभाषेला अधिक समृद्ध करीत आहे.

विद्यार्थ्यांना आणि समाजाला मराठी मातृभाषेचे विविध क्षेत्रात होणारे आविष्कार आणि त्याचे उपयोजन कसे करायचे यासाठी महाविद्यालय प्रयत्न करीत आहे. यामध्ये मराठी विभागातील विद्यार्थ्यांचे बौद्धिक सहकार्य मोलाचे ठरत आहे.

- डॉ. सुभाष वाघमारे,

मराठी विभागप्रमुख, छत्रपती शिवाजी महाविद्यालय.