शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे, जयकुमार, विलासकाका बाहेरच !

By admin | Updated: May 19, 2015 00:32 IST

जिल्हा बँक कार्यकारी कमिटी : मात्र विरोधकांना मिळणार इतर ठिकाणी संधी

सागर गुजर - सातारा -जिल्हा मध्यवर्ती बँकेतील धोरणात्मक निर्णयांचा आत्मा असणाऱ्या कार्यकारी समितीपासून विरोधकांना दूर ठेवण्याची परंपरा याहीवेळी अबाधित राहण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेही या समितीत नसणार, हे आता स्पष्ट झाले असून, आ. जयकुमार गोरे व बँकेचे माजी अध्यक्ष विलासराव पाटील-उंडाळकर यांनाही कार्यकारी समितीच्या बाहेर ठेवल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.बँकेतील धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार कार्यकारी समितीला आहेत. मागील आठ वर्षांच्या कालावधीमध्ये २४ संचालकांपैकी २१ संचालकांना या समितीत संधी देण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून निवडून आलेल्या संचालकांनाच या समितीत घेण्यात आले होते. उदयनराजे विरोधात निवडून आले असल्याने त्यांना या समितीत घेतले गेले नाही. अनेक वर्षे बँकेचे सर्वेसर्वा ठरलेल्या विलासराव पाटील-उंडाळकरांना प्रथमच या समितीच्या बाहेर राहावे लागले होते. नवीन संचालक मंडळांतील २१ पैकी १८ संचालक राष्ट्रवादीचे आहेत. या १८ संचालकांना कार्यकारी समितीत संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे उदयनराजेंसह, आ. गोरे व विलासकाका हे तिघेजण परकेच राहणार आहेत.जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तर उपाध्यक्षपदी सुनील माने यांची नियुक्ती झाली आहे. संचालक मंडळाने समितीच्या निवडीबाबतचे सर्व अधिकारी शिवेंद्रसिंहराजेंना दिले आहेत. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या दृष्टीने उदयनराजे हे दोघांनाही जवळचे आहेत. शिवेंद्रसिंहराजे तर उदयनराजेंचे धाकटे बंधू आहेत. सातारा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोघांच्या मनोमिलनाची सत्ता आहे. या परिस्थितीत उदयनराजे कार्यकारी समितीत दिसतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीने विरोधकांना कार्यकारी समितीचे दरवाजे बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय आधीच घेतला होता. त्यात आता बदल होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.बँकेच्या निवडणुकीत उदयनराजेंना बिनविरोध करून राष्ट्रवादीने एक चाल खेळली. उदयनराजे बिनविरोध झाले; मात्र ते सत्तेत नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. शनिवारी बोर्ड कमिटीची बैठकजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बोर्ड कमिटीची प्राथमिक बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती. या बैठकीत कमिट्यांबाबतच्या चर्चाही झाली होती. येत्या दोन दिवसांत कार्यकारी समित्यांसह इतर समित्यांत कोणाकोणाची वर्णी लागणार हे कळेल. शनिवारी संचालक मंडळाची बैठक होणार आहे.इतर समित्यांत संधी शक्यजिल्हा बँकेत नियोजन, आॅडिट, संगणक, सेवक, सोने गहाण, इमारत, अनिश्चित पट अशा समित्या असणार आहेत, या समित्यांवर विरोधकांना संधी देण्यात येऊ शकते.