शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे राजकीय भूकंपाच्या तयारीत

By admin | Updated: September 20, 2014 00:33 IST

‘जलमंदिर’वर बैठक : सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याबद्दल कार्यकर्त्यांची नाराजी

सातारा : विधानसभेची निवडणूक उंबरठ्याशी येऊन ठेपली असतानाच ‘मोठा राजकीय भूकंप’ करण्याचे संकेत खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘कार्यकर्त्यांचा सन्मान होईल असा निर्णय’ लवकरच घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ‘जलमंदिर पॅलेस’ येथील उदयनराजेंच्या संपर्क कार्यालयात झाली. केवळ उदयनराजेंचे कार्यकर्ते म्हणून विविध विकासकामांच्या संदर्भात आपली जाणूनबुजून अडवणूक होत असून, दुजाभाव व सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी या बैठकीत व्यक्त केल्या. ‘याबाबबत तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित करुन, कार्यकर्त्यांची खंत तपासून, त्यांच्या भावनांचा आदर राखण्यासाठी निर्णायक भूमिका जाहीर करु’ असे उद््गार खासदार उदयनराजे यांनी यावेळी काढले. यामुळे नजीकच्या काळात जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होऊन अनेक जणांचे गड कोलमडून पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. ‘आमच्या तालुका किंंवा जिल्हा पातळीवरील प्रस्तावांची पध्दतशीर बोळवण केली जाते किंंवा अडवणूक केली जाते. ही अडवणूक आम्ही केवळ खासदार उदयनराजेंचे कार्यकर्ते असल्यानेच केली जाते. त्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रस्ताव प्रलंबित कसे राहतील, लांबवले कसे जातील, तांत्रिकदृष्ट्या रद्द कसे होतील असे षड्यंंत्र हेतुपुरस्सर राबविले जात आहे. याबाबत आपण शहानिशा करावी. आम्ही त्याची उदाहरणे लगेच देऊ,’ असे संतप्त गाऱ्हाणे प्रमुख कार्यकर्त्यांनी खासदार उदयनराजेंसमोर मांडले. त्याचबरोबर, ‘आपण आम्हाला दिशा द्या, आम्ही ताकद दाखवून देऊ; परंतु अशा प्रकारची अडवणूक, अपमान, दुजाभाव, सापत्नपणाची वागणूकसहन करणार नाही,’ असा निर्धारही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला, असे ‘जलमंदिर’मधून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.‘कार्यकर्त्यांमुळे मी आहे. कार्यकर्त्यांपेक्षा मी मोठा नाही. कार्यकर्त्यांची वेदना ती आमची वेदना. तीच माझी भूमिका आहे. खरोखरच सापत्नभावाची वागणूक आणि दुजाभाव होत असेल तर कार्यकर्त्यांचा अपमान गिळून गप्प बसणार नाही. लवकरच तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करुन, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखला जाईल असा निर्णय घेईन,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिलासा दिल्याचे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी) कुणाकुणावर साधणार नेम..?लोकसभा निवडणुकीपूर्वीच उदयनराजेंच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या कुरघोड्या आणि उदयनराजेंना उघड विरोध अशा बाबी जगजाहीर झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर सर्व उमेदवार लोकसभा निवडणुकीत ‘काठावर पास’ झाले असताना उदयनराजेंनी मोठे मताधिक्य मिळविले होते. पक्षांतर्गत विरोधाला हे चपखल उत्तर मानले जात असतानाच ‘राष्ट्रवादीचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांचे हे गाऱ्हाणे नव्याने समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजेंनी राजकीय भूकंपाचे सूतोवाच केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.