शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीसाठी गेलेल्या दोघे वायरमनला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:52 IST

पाचगणी : पाचगणी महावितरण कार्यालयाच्या दोन कर्मचाऱ्यांना बिल वसुलीसाठी गेले असता खिंगर (ता. महाबळेश्वर) येथे मारहाण झाल्याची घटना घडल्याने ...

पाचगणी : पाचगणी महावितरण कार्यालयाच्या दोन कर्मचाऱ्यांना बिल वसुलीसाठी गेले असता खिंगर (ता. महाबळेश्वर) येथे मारहाण झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या विरोधात शुक्रवारी काम बंद आंदोलन करून पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, खिंगर (ता. महाबळेश्वर) येथे गुरुवारी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास थकीत बिल वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी नितीन आंब्राळे व शिवाजी मालुसरे गेले असता, या दोन वायरमनना सूरज दीपक झुंज, राकेश दीपक झुंज, बबिता दीपक झुंज यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत वायरमन यांनी सांगितल्यावरून या तिघा विरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरून पाचगणी पोलिसांकडून या तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलाश रसाळ व त्यांचे सहकारी करीत आहेत.

दरम्यान, वायरमनला मारहाण करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठीचे निवेदन सहायक उपपोलीस निरीक्षक यशवंत महामुलकर यांना देण्यात आले असून, संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी पाचगणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता सचिन बाचल, सहायक अभियंता अशोक पाटील, पाचगणी शहर, वसूल अधिकारी जितेंद्र खांडके, राजू खरात व पाचगणी उपविभागातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

फोटो : 26पाचगणी

पाचगणी महावितरणच्या कार्यालयासमोर शुक्रवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.