शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात सराईत दुचाकी चोरटे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 11:23 IST

सातारा शहर व परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

ठळक मुद्देसाताऱ्यात सराईत दुचाकी चोरटे अटकेतदोन दुचाकी हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा : शहर व परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.धनंजय राजेंद्र पंडित (रा. शनिवार पेठ, सातारा), राजेश गणेश वंजारी (वय ४५, रा. गुरुवार पेठ, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोघेजण चोरीच्या दुचाकी घेऊन कमानी हौदाजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे सापळा लावल्या. त्यावेळी पंडित आणि वंजारी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी या दुचाकी शाहूपुरी पोलीस ठाणे आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरून आणल्याची कबुली दिली. या दोघांकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

पुढील तपासाच्या अनुषंगाने या दोघांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड, हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, विशाल पवार, संजय जाधव यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर