शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नातवाचा वाढदिवस पडला दोन लाखांना!

By admin | Updated: July 11, 2014 23:17 IST

चचेगावात घरफोडी : घरातील वस्तंूची मोडतोड

मलकापूर : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेसहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. चचेगाव, ता. कऱ्हाड येथे बुधवारी रात्री ही घटना घडली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चचेगाव महादेव दौलत पवार यांचे गावामध्ये भवानी मंदिरामागे राहते घर आहे. संबंधित घरामध्ये महादेव पवार यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, सून व नातू वास्तव्यास आहेत. बुधवारी नातवाचा वाढदिवस असल्याने महादेव पवार यांच्यासह कुटुंबातील सर्वजण रेठरे खुर्दमध्ये गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर पवार कुटुंबीय रेठरे खुर्दमध्येच राहिले. गुरुवारी सकाळी ते परत आपल्या घरी चचेगावमध्ये आले. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी कपाटाचे दार कटावणीने उचकटून अडीच तोळ्याची बोरमाळ, अंगठ्या, चैन, बदाम आदींसह इतर चार तोळ्याचे दागिने असा सुमारे साडेसहा तोळ्यांचा ऐवज व मनगटी घड्याळ, मोबाईल लंपास केला. काही महत्त्वाची कागदपत्रेही त्यांनी चोरून नेली. (प्रतिनिधी)पन्नास हजारांचे नुकसानचोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर चोरीबरोबरच वस्तूंची तोडफोडही केली. कपाट, फ्रिज, पलंग, भांड्याचे कपाट आदी साहित्यांची त्यांनी मोडतोड केली. तसेच खाद्यवस्तू, डाळी भरून ठेवलेल्या बरण्या चोरट्यांनी घरातील चारही खोल्यात विस्कटल्या. ही चोरी माहितीच्या व्यक्तीने सुडबुद्धीने केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.