कासरथळ येथे ट्रक उलटला; पाचजण गंभीर जखमी, उरमोडी धरणालगत अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 23:24 IST2026-05-08T23:24:12+5:302026-05-08T23:24:46+5:30

रात्रीच्या सुमारास जेसीबीने बचाव कार्य

truck overturns in kasarthal satara five seriously injured accident near urmodi dam | कासरथळ येथे ट्रक उलटला; पाचजण गंभीर जखमी, उरमोडी धरणालगत अपघात

कासरथळ येथे ट्रक उलटला; पाचजण गंभीर जखमी, उरमोडी धरणालगत अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : सातारा तालुक्याच्या पश्चिम भागातील उरमोडी धरणालगत कासरथळ येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सामानाचा ट्रक पलटी झाला. त्यामुळे रात्रीच्या सुमारासच मोठ्या प्रमाणात बचाव कार्य हाती घेण्यात आले. यासाठी जेसीबी आणला. तरीही या ट्रकखाली सापडून पाचजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना त्यांनी रुग्णवाहिकेतून साताऱ्यातील रुग्णालयात पाठविले.

अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की, सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात उरमोडी धरण आहे. या धरणाच्या मागील बाजुस कासरथळ गाव आहे. या गावाजवळच शुक्रवारी रात्री ट्रकचा अपघात झाला. ट्रकमध्ये सामान भरलेले होते. तसेच काही लोक बसले होते. रस्ता अरुंद असल्याने रात्रीच्या सुमारास ट्रक पलटी झाला. त्यामुळे ट्रकखाली काहीजण अडकले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी रात्रीच्या सुमारास बचाव कार्य हाती घेतले. यासाठी जेसीबी आणून जखमींना बाहेर काढण्यात आले. यामध्ये किमान पाचजण गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. त्यांना रुग्णवाहिकेतून साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. तर या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले हे घटनास्थळी गेले. त्यांनी सर्व यंत्रणांना संपर्क साधून मदत कार्य सुरू केले.

सातारा तालुक्यातील कासारथळ येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ट्रक पलटी झाला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. मी परळी येथे होतो. तेव्हा अपघाताची मला माहिती मिळाली. त्यानंतर लगेच मी अपघातस्थळी गेलो आणि बचाव कार्याला वेग दिला. अपघातातील जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. - राजू भोसले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष

Web Title : कासरथळ में ट्रक पलटा; उरमोडी बांध के पास पांच गंभीर रूप से घायल

Web Summary : कासरथळ में उरमोडी बांध के पास एक ट्रक दुर्घटना में पांच लोग गंभीर रूप से घायल हो गए। स्थानीय लोगों और अधिकारियों ने बचाव अभियान शुरू किया और घायलों को सतारा के अस्पताल पहुंचाया। जांच जारी है।

Web Title : Truck Overturns at Kasarathal; Five Seriously Injured Near Urmodi Dam

Web Summary : A truck accident near Urmodi Dam in Kasarathal injured five seriously. Locals and officials initiated rescue operations, rushing the injured to a Satara hospital. An investigation is underway.

टॅग्स :Accidentअपघात