कंटेनरच्या जोरदार धडकेत शाळकरी मुलासह दोघे ठार

By Admin | Updated: November 6, 2015 23:37 IST2015-11-06T23:30:47+5:302015-11-06T23:37:08+5:30

मालखेडजवळ अपघात : दोघेजण गंभीर; दुचाकींना धडक

In the tremor of the container, both of them were killed along with a schoolboy | कंटेनरच्या जोरदार धडकेत शाळकरी मुलासह दोघे ठार

कंटेनरच्या जोरदार धडकेत शाळकरी मुलासह दोघे ठार

कऱ्हाड : मालखेड, ता. कऱ्हाड येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींना कंटेनरने जोराची धडक दिली. या अपघातात शाळकरी मुलासह अन्य एकजण ठार तर दोघे जखमी झाले. शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला.
विशाल सर्जेराव पवार (वय ३१, रा. कडेगाव, जि. सांगली) आणि लक्ष्मण पांडुरंग लोंढे (रा. बैलबाजार रोड, मलकापूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर जखमी झालेल्या विशाल कदम (रा. शिवाजीनगर, ता. कडेगाव) नितीन मोहन कसबे (रा. मलकापूर) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर बाजूकडून एक कंटेनर शुक्रवारी पहाटे वेगाने पुण्याकडे निघाला होता. पहाटेच्या सुमारास कंटेनर मालखेडजवळ आल्यावर त्याच्यासमोरून दोन दुचाकींवरून चौघेजण निघाले होते. मालखेडच्या पुलावर आल्यानंतर कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटला. ताबा सुटलेल्या कंटेनरने समोरून निघालेल्या दोन्ही दुचाकींना जोराची धडक दिली.
दुचाकींवरील चौघेजण कंटेनरखाली अडकले. यातील दोघांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
डोक्यास गंभीर मार लागल्याने विशाल पवार हा जागीच ठार झाला तर लक्ष्मण लोंढे याला उपचारास नेत असताना त्याचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींंद्र शिंदे तपास करत आहेत.
अपघातात मृत झालेला लक्ष्मण लोंढे हा मूळचा सोलापूरचा आहे. त्याचे कुटुंबीय तिकडेच असून, तो शिक्षणासाठी मलकापूरच्या बैलबाजार रोडवर राहणाऱ्या आजीकडे वास्तव्यास होता. तो मलकापूरच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात नववीत शिक्षण घेत होता. त्याच्या मित्राचे नातेवाईक कोल्हापूर येथे आजारी असल्याने त्यांना पाहावयास तो दुचाकीवरून अन्य एका मित्रासमवेत गेल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 

Web Title: In the tremor of the container, both of them were killed along with a schoolboy