शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ सद्‌गुरू मच्छीमार संस्थेच्या वतीने मच्छीमारांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

येथील समर्थ सद्‌गुरू मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने उरमोडी धरणात मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याबरोबर त्यांना अत्याधुनिक पद्धतीने ...

येथील समर्थ सद्‌गुरू मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने उरमोडी धरणात मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याबरोबर त्यांना अत्याधुनिक पद्धतीने मासेमारी करण्यासाठी आवश्यक असणारी जाळी संस्थेच्या माध्यमातून दिली जातील तसेच शासकीय योजनांचा लाभही देण्यात येईल, असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष रमेश देवरे यांनी दिले.

उरमोडी धरणात पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या कातकरी समाजाच्या मच्छीमारांना तसेच उरमोडी धरणात मच्छीमारी करणाऱ्या बुडीत क्षेत्रातील लोकांना संस्थेच्या वतीने प्रशिक्षण आणि मदत मिळण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीकांत वारुंजीकर, निवृत्त मत्स्य व्यवसाय अधिकारी घाडगे, डॉ. कुडले यांनी मार्गदर्शन केले.

मत्स्य विकास अधिकारी वारुंजीकर म्हणाले, शासनाच्या वतीने मच्छीमारांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घेतला पाहिजे. शेततळ्याच्या माध्यमातून, खुल्या धरणातून तसेच बायोफ्लोक पद्धतीने मत्स्यपालन आणि मासेमारी करता येते. त्यासाठीच्या विविध योजनांचाही लाभ घ्यावा.

घाडगे म्हणाले, रंगीत मासेपालन आणि त्याच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. याची माहिती घेऊन मत्स्य व्यवसाय केला पाहिजे.

समर्थ सद्‌गुरू संस्थेचे अध्यक्ष रमेश देवरे यांनीही यावेळी संस्थेच्या माध्यमातून भागातील लोकांसाठी विविध योजना राबविण्यात येतील तसेच आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी उरमोडी मातेची ओटीभरणही करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव रवींद्र वाईकर, शशी वाईकर, सुधीर देसाई, गजानन वाईकर, गणेश कदम, सुनील केंजळे, किरण वांगडे, मनोज देवरे, काशीनाथ शेलार यांच्यासह भागातील संस्थेचे सभासद व मच्छीमार उपस्थित होते.