शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांची गाडी आगीत खाक

By admin | Updated: May 23, 2015 00:33 IST

महाबळेश्वर येथील घटना : पर्यटकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

महाबळेश्वर : वेण्णा लेक रस्त्यावर हिंदू जिमखान्याजवळ पर्यटकांच्या स्कॉर्पिओ गाडीला अचानक लागलेल्या आगीत गाडी जळून खाक झाली. सुदैवाने गाडीतून धूर येत असल्याचे दिसताच गाडीतील सर्व लोकांनी बाहेर उड्या घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेमुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.पाचगणीजवळ असलेल्या शिंदेवाडी येथील विशाल बाजीराव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत महाबळेश्वरला फिरण्यासाठी आले होते. महाबळेश्वर येथे पॉइंट फिरून सायंकाळी वेण्णा लेक येथे थांबण्याचा बेत ठरला होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गाडीत डिझेल भरून ही सर्व मंडळी वेण्णा लेककडे निघाली होती. गाडी हिरडा नाका सोडून हिंदू जिमखान्याच्या गेटजवळ आल्यानंतर गाडीच्या इंजिनमधून व चालकाशेजारील सीटखालून धूर येण्यास सुरुवात झाली. पाहता-पाहता आग वाढू लागल्याने सर्वजण गाडीतून बाहेर पडले. यानंतर गाडीने पेट घेतला व आगीत गाडी जळून खाक झाली.गाडीला आग लागताच तेथे असलेले काही स्थानिकांनी वेण्णा लेक येथून भरून निघालेला एक पाण्याचा टँकर थांबविला व आग विझविण्यास प्रयत्न केला. उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, नगरसेवक नीलेश बावळेकर, राजू शिर्के, संजय पारठे, पालिका कर्मचारी आबाजी ढोबळे यांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.दरम्यान, गाडीला आग लागल्याचे समजताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वेण्णा लेक व शहराच्या बाजूला मोठी वाहतुकीची कोंंडी झाली होती. सुमारे दीड तासानांतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. (प्रतिनिधी)पालिकेचा आपत्कालीन विभाग सुस्त शुक्रवारी पालिका सभागृहात आपत्कालीन व्यवस्थापनासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोणत्याही क्षणी खबर येऊ शकते अशा वेळी आपण घटनास्थळी तातडीने धावून जाऊन अपघातग्रस्तांची मदत पोहोचविण्यासाठी दक्ष राहिले पाहिजे, अशा सूचना केल्या होत्या; परंतु पालिकेच्या आपत्कालीन विभागात अग्निशामक बंब मागणीसाठी साधारण १५ मिनिटे फोन वाजतच होता.