शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

आधी सुविधा मगच मिळणार टोलचा मेवा : पवनजित माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:02 IST

रस्ता चांगला केला तर टोल द्यायला कोणालाच काहीच वाटणार नाही. सुविधेशिवाय टोल घेणं हा खंडणीचाच प्रकार वाटतोय. - पवनजित माने

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद == टोल फ्री... होल फ्री... झोल फ्री ची साद

प्रगती जाधव-पाटील ।वाहन चालवताना रस्त्यावर किमान सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने टोल फ्री, होल फ्री, झोल फ्री अशी अनोखी मोहीम फेसबुकच्या माध्यमातून गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. या मोहिमेत साताऱ्यातील पवनजित माने याने पुढाकार घेतला आहे. टोलमुक्त रस्त्यांची हाक देणा-या पवनजितने या मोहिमेविषयी संवाद साधला ...

प्रश्न : या मोहिमेची सुरुवात कशी झाली आणि पुढील स्वरुप कसे आहे?उत्तर : सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांतून नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्यांमध्ये रस्त्यांची दुर्दशा या अनुषंगाने कायम चर्चा व्हायची. कष्टानं कमावलेले पैसे पात्रता नसलेल्या रस्त्यासाठी टोलच्या स्वरुपात का भरायचे? असा प्रश्न अनेकांना पडला. याविषयी आम्ही एकत्र चर्चा करत असतानाच ही मोहीम आकाराला येऊ लागली. सर्वसामान्यांसह स्थानिकांना सोबत घेऊन ही मोहीम पुढं नेण्याचं नियोजित आहे. यासाठीची पूर्ण यंत्रणा पुण्यातून कार्यान्वित होत आहे. याची जनहित याचिकाही लवकरच दाखल करणार आहे.

प्रश्न : मोहिमेला प्रतिसाद कसा मिळतोय?उत्तर : ही मोहीम मुळातच सामान्यांच्या उठावाचा परिणाम आहे. अनेकांच्या मनातील प्रश्न आम्ही समाज माध्यमांद्वारे मांडला आणि तो सर्वांनाच भावला. हजारो नेटकºयांनी ही पोस्ट आपापल्या परीनं फिरवली आणि मोहीम सुरू झाली. लोकांचा सहभाग वाढवून त्यांना आपल्या न्याय हक्कांची जाणीव करून देणं हा या मोहिमेचा पुढील टप्पा असणार आहे. त्याबरोबरच असुविधा असणाºया रस्त्यांवर टोलबंदी हा विषयही न्यायालयात याचिकेद्वारे मांडण्यात येणार आहे. प्रत्येक गावात ‘नो टोल बुथ’ दिवाळीनंतर सुरू करणार आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांपुढं जनरेट्याचा आधार घेऊन काम करण्यास भाग पाडणार. समाज माध्यमांद्वारे जास्तीत जास्त लोकांना याप्रश्नी जागृत करून त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यास सर्व स्त्रातून या माहिमेस प्रतिसाद मिळत आहे.प्रशासनाला निवेदनसलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे पुण्यातून कोण, कसं आणि कधी प्रवास करणार याची एकत्रित माहिती आम्हाला संकलित करणं शक्य झालं नाही. त्यामुळे सातारा प्रशासनाला निवेदन दिलं नसल्याचे पवनजितने सांगितले.मंत्रिमंडळापुढे मांडणार प्रश्नसोशल मीडियाद्वारे सुरू झालेली ही मोहीम व्यापक प्रसिद्धी मिळवत आहे. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, मतदान आणि मतमोजणी यामुळे प्रशासनावर सध्या चांगलाच ताण आहे. त्यानंतर येणारी दिवाळी यामुळे अनेकजण उत्सवाच्या तयारीत आहेत. सर्वांचा विचार करता सध्या सर्वांकडून माहिती घेणं आणि संकलित करून ठेवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. दिवाळीनंतर नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर सविस्तर आराखडा मांडणार आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाSatara areaसातारा परिसरSocial Mediaसोशल मीडिया