शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

आजी सतत अभ्यास कर म्हणतेय म्हणून सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:58 AM

आजी सतत अभ्यास कर, असे म्हणते म्हणून सहावीतील एका मुलाने साताऱ्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सातारा बसस्थानक प्रमुख व पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. संबंधित मुलाने यापूर्वीही आपल्या आईला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देआजी सतत अभ्यास कर म्हणतेय म्हणून सोडले घरपोलिसांकडून समुपदेशन : सहावीतील मुलगा सापडला बसस्थानकात

सातारा : आजी सतत अभ्यास कर, असे म्हणते म्हणून सहावीतील एका मुलाने साताऱ्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सातारा बसस्थानक प्रमुख व पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. संबंधित मुलाने यापूर्वीही आपल्या आईला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये बारा वर्षांचा मुलगा एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे आई-वडील मुंबई येथे राहतात. तर तो सातारा येथे आपल्या आजीकडे राहतो. आजी त्याला सतत अभ्यास करण्याचा सल्ला देत असल्यामुळे सततच्या सल्ल्याला तो वैतागला होता.

अभ्यास केला नाही तर कधी कधी त्याला आजी मारही देत असत. तो चांगला शिकावा यासाठी त्याच्या आजीने त्याला साताऱ्यातील एका इंग्लिश मीडियममध्ये एक लाख रुपये फी भरून दाखल केले होते. पुढे खर्च परवडत नसल्याने त्याला दुसऱ्या एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दाखल केले होते.

दरम्यान, शनिवारी सकाळची शाळा सुटल्यानंतर आजीने दिलेले पंधरा रुपये घेऊन तो औद्योगिक वसाहतीतून रिक्षाने बसस्थानकात आला. मात्र तेथील गर्दी पाहून त्याला रडू कोसळले. रडतच तो सातारा बसस्थानक प्रमुख सय्यद यांच्या कार्यालयात गेला.सय्यद यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आपण घरातून पळून आल्याची माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून सय्यद यांनी सातारा बसस्थानकातील पोलीस चौकीत कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार, दत्ता पवार यांना या घटनेची माहिती दिली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी सय्यद यांच्या कार्यालयात जाऊन त्याची विचारपूस करून साधारण दोन तास त्याचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याला त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.कुठंतरी जायचं..पण घरात नाय थांबायचं!संबंधित अल्पवयीन मुलाकडे पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितलेली माहिती ऐकून पोलीस अवाक् झाले. कुठंतरी जाणार होतो; पण मला घरात थांबायचं नव्हतं. पण तू कुठे जाणार होता, असे पोलिसांनी विचारल्यानंतर त्याने बस जाईल तिकडे जाणार होतो, असे उत्तर दिले.

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर