शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST

मायणी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील यात्रा, उत्सव व जत्रांवर शासनाकडून अनेक निर्बंध घालण्यात येत ...

मायणी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील यात्रा, उत्सव व जत्रांवर शासनाकडून अनेक निर्बंध घालण्यात येत आहेत. त्यामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने या कलाकारांना व कलावंतांना आर्थिक मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दीपावलीनंतर ग्रामीण व शहरी भागातील अनेक यात्रा, जत्रा व उत्सव प्रतिवर्षी होत असतात. ग्रामीण भागामध्ये लोकांची करमणूक करण्यासाठी विविध धार्मिक, सामाजिक क्षेत्रांत कार्य करीत असलेल्या विविध संघटनांकडून लोकनाट्य, तमाशा दाखविण्यात येतात. या लोककलेची महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठी मागणी असते. महाराष्ट्रात शेकडो लोकनाट्य तमाशा मंडळे आहेत. यामध्ये हजारो कलाकार काम करीत आहेत. तसेच या लोकनाट्य तमाशा मंडळांमध्ये अनेकांना रोजगाराची संधी मिळालेली असते.

मात्र, गतवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनामार्फत विविध निर्बंध लादण्यात आले. तसेच सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे ग्रामीण भागातील यात्रा, उत्सवही बंद राहिले होते. त्यामुळे संपूर्ण वर्ष या लोककलावंतांनी घरातच बसून काढले. हाताला कोणतेही काम नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता.

यावर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शासनाने यात्रा, उत्सव व जत्रा भरवण्यास परवानगी दिली. त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडे-थोडे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पंधरा दिवसांच्या आतच या उत्सवावर शासनाने पुन्हा बंदी घातल्यामुळे या लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने यांना आर्थिक मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.

(चौकट )

सांगा पैसे कोठून आणायचे ?

आपल्या कलावंत व कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी यात्रा, उत्सव चालू होतील. या आशेवर मिळेल तिथून आर्थिक फंड गोळा केला होता. तसेच खासगी सावकारांकडूनही आर्थिक मदत कर्जरुपाने घेतली. मात्र, संपूर्ण वर्षात कार्यक्रम न झाल्याने हे पैसे कोठून आणायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

(कोट..)

आमच्या मंडळामध्ये एकूण ३५ कलाकार आहेत. यातून २५ कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. या कुटुंबांमध्ये शंभराहून अधिक सदस्य आहेत. मात्र, गतवर्षीपासून यात्रा, उत्सव, जत्रा यावर बंदी आल्याने या संपूर्ण कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने मदत करण्याची गरज आहे.

-प्रशांत वन्ने-पडळकर,

तमाशा मंडळ मालक,