लग्न न केल्यास तरुणीला बदनामीची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:23 IST2021-07-23T04:23:54+5:302021-07-23T04:23:54+5:30

सातारा : ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर मी तुझी व तुझ्या घरच्यांची बदनामी करेन’, अशी धमकी एका तरुणाने तरुणीला दिल्याची ...

Threats to defame a young woman if she does not marry | लग्न न केल्यास तरुणीला बदनामीची धमकी

लग्न न केल्यास तरुणीला बदनामीची धमकी

सातारा : ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर मी तुझी व तुझ्या घरच्यांची बदनामी करेन’, अशी धमकी एका तरुणाने तरुणीला दिल्याची घटना साताऱ्यात घडली. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात संबंधित तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

शंकर पांडुरंग जाधव (वय २०, रा. निझरे, ता. जावळी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शंकर जाधव हा संबंधित वीस वर्षीय तरुणीचा वारंवार पाठलाग करत होता. त्यामुळे संबंधित तरुणीने त्याला ‘माझा पाठलाग का करत आहेस’, असे विचारले. यावर शंकर जाधवने ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझी बदनामी करेन’, अशी धमकी दिली. हा प्रकार तरुणीने घरच्यांना सांगून पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रात्री उशिरापर्यंत शंकर जाधव याला पोलिसांनी अटक केली नव्हती.

Web Title: Threats to defame a young woman if she does not marry