Satara News: लैंगिक अत्याचारातील ‘त्या’ २४ मुलांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात, तपास अत्यंत गोपनीय सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:05 IST2026-03-19T15:04:15+5:302026-03-19T15:05:23+5:30

प्रकरणाचा तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू

The recording of statements of 24 children who were victims of sexual abuse at a renowned school in Satara city has begun | Satara News: लैंगिक अत्याचारातील ‘त्या’ २४ मुलांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात, तपास अत्यंत गोपनीय सुरू

संग्रहित छाया

सातारा : शहरातील नामांकित शाळेत लैंगिक अत्याचारात बळी पडलेल्या २४ मुलांचा जाबजबाब घेण्याचे काम सातारा शहर पोलिसांनी सुरू केले. संबंधित केअर टेकरचे कारनामे आपल्या जबाबात सर्व पीडित मुले नमूद करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सातारा शहरातील एका प्रसिद्ध शाळेमध्ये आठवडाभरापूर्वी केअर टेकरच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या एका मुलाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित केअर टेकरला अटक केली. पोलिसांनी त्याची कसून चाैकशी केली असता त्याने आणखी २४ मुलांचा लैंगिक व मानसिक छळ केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांच्या चाैकशीत पुढे तब्बल २४ मुलांच्या तक्रारी आल्या. तक्रारींची संख्या मोठी असल्यामुळे पोलिसांनी प्रत्येक मुलाचा जाबजबाब घेण्याचे काम हाती घेतले आहे. 

वाचा: मुलांचं गप्प राहणं हाच गुण ‘त्यानं’ हेरला; शाळेत पहाटेच्या अंधारात अश्लील कृत्य, केअरटेकरच्या विकृत कारनाम्याने पालक हादरले

गेल्या दोन दिवसांपासून संबंधित शाळेत जाऊन पोलिस मुलांचा जबाब घेत आहेत. पालक, शिक्षक आणि साध्या वेशातील पोलिसांचा त्यामध्ये समावेश आहे. त्या केअर टेकरने केलेला घृणास्पद प्रकार आता पुढे येऊन मुले धडधडीतपणे सांगत आहेत. त्यातील सर्व मुले अल्पवयीन असल्यामुळे या प्रकरणाचा तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू आहे. या प्रकरणाचे पुरावे गोळा करून लवकरच बालकल्याण समिती व न्यायालयात अहवाल सादर केला जाणार आहे. संबंधित आरोपीला शिक्षा होईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

‘त्या’ प्रसंगातून पालक सावरताहेत..

संबंधित मुलांवर घडलेल्या प्रसंगातून त्यांचे पालक सावरत आहेत. मात्र, मुलांना धीर देण्यासाठी आणि मुलांनी ही घटना विसरून शिक्षणाकडे लक्ष द्यावे, यासाठी पालकांना सतत शाळेत यावे लागत आहे. असेही एका पालकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title : सतारा स्कूल दुर्व्यवहार: 24 बच्चों के बयान दर्ज, जांच जारी

Web Summary : सतारा पुलिस एक प्रतिष्ठित स्कूल में दुर्व्यवहार के शिकार 24 बच्चों के बयान दर्ज कर रही है। एक शिकायत के बाद एक केयरटेकर के कार्यों का खुलासा हुआ। जांच गोपनीय है, बच्चों की भलाई को प्राथमिकता दी जा रही है, बाल कल्याण समिति और अदालत को जल्द ही एक रिपोर्ट सौंपी जाएगी। माता-पिता से अपने बच्चों का समर्थन करने का आग्रह किया गया है।

Web Title : Satara School Abuse: Statements Recorded, Investigation Underway for 24 Children

Web Summary : Satara police are recording statements from 24 children abused at a reputed school. A caretaker's actions were revealed after a complaint. The investigation is confidential, prioritizing the children's well-being, with a report soon to be submitted to the child welfare committee and court. Parents are urged to support their children.