शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: चोरी पकडली; मस्तक फिरलं, रिटायर्ड फौजीच्या हातून भलंतच घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:54 IST

पोलिसांच्या डोळ्यात डोळे घालून तो वेगवेगळ्या घटना पोलिसांना सांगत होता. परंतु, पोलिसांनी अत्यंत काैशल्याने त्याला बोलतं केलं

सातारा : घरात कोणी नसताना शेतमजुरानं कपाटं उघडलं. त्याच्या हाताला २२ हजारांची रोकड लागली. याचवेळी रिटायर्ड फाैजीने घरात प्रवेश केला. मजुराने चोरी केल्याचे पाहून फाैजीचं मस्तक फिरलं. घरातल्या धारदार शस्त्राने त्याचा खून केला. एवढ्यावरच न थांबता शेतमजुराचा मृतदेह जाळून विहिरीतही फेकला. पण, पोलिसांच्या काैशल्यामुळे सहा महिन्यानंतर फाैजीच्या कृत्याचा भांडाफोड झाला.सातारा तालुक्यातील निनाम पाडळीतील शेतमजूर संभाजी शेलार (वय ४३) हे घरातून काहीएक न सांगता निघून गेल्याची तक्रार त्यांच्या बहिणीने जून महिन्यात बोरगाव पाेलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी मिसिंग म्हणून हे प्रकरण नोंदवून घेतलं. संभाजी शेलार यांना शेवटचे कोणासोबत पाहिले हाेतं, याची माहिती पोलिस घेत होते. तेव्हा माजी सैनिक भरत ढाणे याचे नाव समोर आले. बोरगाव पोलिसांनी त्याला चाैकशीसाठी बोलावलं. पण, त्यानं म्हणे, संभाजी मला भेटून कोठे निघून गेला, हे मलाही माहिती नाही, असं उत्तर दिलं. पोलिसांनी त्याची जुजबी चाैकशी केल्यानंतर त्याने सुटकेचा निश्वास सोडला. परंतु, सहा महिन्यानंतर शेतमजुराच्या मिसिंग प्रकरणाने पुन्हा डोके वर काढले. रिटायर्ड फाैजी भरत ढाणे यानेच शेतमजुराचा खून केल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, राेहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करून तपासाला पाठवले. या पथकाने भरत ढाणेला चाैकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याची चाैकशी सुरू केली. परंतु, तो मी नव्हेच, अशा अविर्भावात तो पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाला धडधडीतपणे उत्तरे देऊ लागला. पोलिसांच्या डोळ्यात डोळे घालून तो वेगवेगळ्या घटना पोलिसांना सांगत होता. परंतु, पोलिसांनी अत्यंत काैशल्याने त्याला बोलतं केलं. संभाजी शेलारला शेवटंच भेटणारा तूच आहेस. याचा प्रत्यक्षदर्शी व्यक्ती आमच्याकडे आहे, असं म्हणताच भरत ढाणेने आपला गुन्हा कबूल केला. त्याची चोरी पकडल्यानं माझं मस्तक फिरलं. रागाच्या भरात त्याला संपवून टाकलं, अशी धक्कादायक माहिती त्यानं पोलिसांजवळ दिली.

सन्मान ‘त्यानं’ क्षणात लयाला लावलाशेतमजुराने चोरी केल्याचे पकडल्यानंतर रिटायर्ड फाैजीने त्याला पोलिसांच्या ताब्यात देणे गरजेचे होते. मात्र, कायदा हातात घेऊन त्याने स्वत:च्या आणि शेतमजुराच्या कुटुंबाचीही वाताहात लावली. एवढेच नव्हे तर देशसेवा करून मिळवलेला सन्मान त्यानं क्षणात लयाला लावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Theft exposed; retired soldier kills, disposes of farmhand's body.

Web Summary : In Satara, a retired soldier killed a farmhand caught stealing, then disposed of the body in a well. Police investigation revealed the crime six months later.