शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तमाशा कलावंतांचे प्रश्न सोडविणार : बनसोडे

By admin | Updated: June 11, 2015 00:53 IST

कोपर्डे हवेली : तमाशा फडमालक व कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार

कोपर्डे हवेली : ‘तमाशा फडमालक व कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार आहे,’ अशी ग्वाही तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी दिली.लोकनाट्य तमाशा फडमालक व कलावंतांचा राज्यस्तरीय मेळावा मंगळवारी करवडी, ता. कऱ्हाड येथे पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. मंगला बनसोडे यांची पु. ल. देशपांडे अकादमीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल तमाशा मालक, चालक, कलावंतांच्या व मराठी तमाशा परिषदेच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक सुखदेव माने होते. प्रमुख पाहुणे रघुवीर खेडकर होते. लोकनाट्य तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव, बजरंग केरार, मुसा इनामदार, अविष्कार मुळे, तानाजी वाघेरीकर, साहेबराव नांदोलेकर, संपतराव खाडे, नौशाद जमादार, रामभाऊ बनसोडे, नितीन बनसोडे, गफुरभाई पुणेकर आदी उपस्थित होते. यावेळी रघुवीर खेडकर म्हणाले, ‘महाराष्ट्र शासनाने मंगला बनसाडे यांची पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सदस्यपदी केलेली निवड हा तमाशा कलावंतांच्या कलेचा सन्मान आहे. असे कौतुक सर्व कलवंतांचे होणे गरजेचे आहे. त्यासाठी तमाशा कलावंतांनी समाजामध्ये मिसळले पाहिजे. तुम्ही समाजाला स्वीकारा, समाज तुम्हाला स्वीकारेल. सर्व कलावंतांनी एकत्र येऊन समाजाच्या सुख-दु:खात सहभागी व्हावे. तमाशा कलावंतांनी आपला व्यवसाय करत ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान केला पाहिजे. त्यासाठीच समिती गठित होणे आवश्यक आहे.’ मुसाभाई इनामदार, उत्तम पिसाळ, संभाजीराजे जाधव, शांताबाई कऱ्हाडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी करवडी तंटामुक्तीचे अध्यक्ष उत्तम पिसाळ, तमाशा कलावंतांची, मालकांची उपस्थिती होती. संभाजीराजे जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उत्तम पिसाळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)