शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सुधा मोरे यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST

....... दरे खुर्द पंचायतीच्या सरपंचपदी कांताबाई धुमाळ सातारा : जावळी तालुक्यातील दरे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कांताबाई धुमाळ तर उपसरपंचपदी ...

.......

दरे खुर्द पंचायतीच्या सरपंचपदी कांताबाई धुमाळ

सातारा : जावळी तालुक्यातील दरे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कांताबाई धुमाळ तर उपसरपंचपदी सयाजी माने यांची निवड झाली आहे. ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक साहेबराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. नूतन सरपंच, उपसरपंच यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक पवार व इतरांनी अभिनंदन केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रज्जाक शेख यांनी काम पाहिले.

.......

केंजळ येथील रस्ता दुरुस्तीची मागणी

वेळे : वाई तालुक्यातील केंजळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने वाई - सुरुर रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वाई यांना निवेदन देण्यात आले. केंजळ फाटा वाई सुरुर रस्त्यावरून प्रवास करताना गावातील विद्यार्थी, ग्रामस्थ व महिलांना रस्ता ओलांडताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्यावर कायमच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात, ज्यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन रस्ता ओलांडताना होणारे अपघात टाळता येतील, असे या निवेदनात म्हटले आहे. केंजळ ग्रामपंचायतीचे सरपंच मिलन गायकवाड, उपसरपंच अमोल कदम, सदस्य नीलेश जगताप व सामाजिक कार्यकर्ते जयंत येवले यांनी हे निवेदन दिले.

.......

इक्बाल काझी यांची निवड

सातारा : गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी इक्बाल काझी यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी जयंत देशपांडे, उपाध्यक्षपदी श्रद्धा करंदीकर, सरचिटणीसपदी महेंद्र पवार, खजिनदारपदी अमृत साळुंखे यांची निवड करण्यात आली. रघुवीर आपटे, दिलीप चरेगावकर, गोपाळ खजुरे, अशोकराव जाधव, गजानन घाडगे आदींनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

.........