शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

मुलींचे लक्ष वेधण्यासाठी स्टंटबाजी

By admin | Updated: August 14, 2015 00:16 IST

दुचाकीस्वारांची धूमस्टाईल : मानसिक त्रास सहन करीत मुलीं घेतायत शिक्षण

संजीव वरे-वाई वाईचे किसन वीर महाविद्यालय हे परिसरातील व तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमुख केंद्र आहे. सवलतीच्या मासिक पासची सोय असलेली एसटी बस हेच मुख्य प्रवासाचे साधन आहे. बसच्या प्रवासादरम्यान टवाळखोर विद्यार्थ्यांच्या उचापतींमुळे मुलींना मानसिक त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे. वाईपासून २५ किलोमीटर पेक्षाही जास्त अंतर असलेल्या दुर्गम व ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात येतात. त्यामुळे बसमध्ये दाटीवाटीने उभे राहून प्रवास करावा लागतो. मुलं मागच्या सीटवर जागा बळकावून दंगा करत बसतात. पायाने स्पर्श करणे, मोबाईलवर गाणी वाजविणे, सीटच्या मागे मुलींची नावे लिहिणे असे उद्योग मागच्या सीटवर बसून सुरू असतात.दोन गटांत हाणामारी होते. हा राडा गावापर्यंत पोहोचतो अन् पुन्हा दोन गावे एकमेकांना भिडतात. असे प्रकार घडत आहेत.शहरात कॉलेजला आल्यानंतर मुलांच्या शहरातील इतर मुलांच्या ओळखी होता. अशा टोळक्यांचा मारामारीसाठी वापर केला जातो. काही जण तर ज्या थांब्यावर मुली उतरतात, तिथे जाऊन थांबतात तर काही जण बसचा दुचाकीवरून पाठलाग करतात. लक्ष वेधण्यासाठी स्टंटबाजीवाईच्या बसस्थानकापासून कॉलेजपर्यंतच्या मार्गावर काही युवक धूमस्टाईल गाडी चालवून स्टंटबाजी करतात. रस्त्याने चाललेल्या मुलींना कट मारले जातात. आपल्याकडे लक्ष जावे, यासाठी असे उद्योग केले जातात.शैक्षणिक नुकसानकॉलेज म्हणजे मौजमस्ती, अशी धारणा झालेल्या मुलांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. टवाळक्या करण्यातच ते वेळ घालवत असतात. बसस्थानक परिसरात, महाविद्यालयाच्या मार्गावर मुलं टोळक्याने फिरताना दिसतात.