शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
3
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
4
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
5
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
7
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
8
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
9
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
10
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
11
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
12
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
13
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
19
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
20
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
Daily Top 2Weekly Top 5

पास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची ससेहोलपट

By admin | Updated: July 3, 2014 00:48 IST

विद्यार्थ्यांची अवस्था : शैक्षणिक नुकसानामुळे पालकही त्रस्त

शामगाव : शामगाव परिसरातील विद्यार्थ्यांची गेल्या काही दिवसांपासून पास मिळवण्यासाठी रोजची धावाधाव सुरू आहे. विद्यार्थ्यांना पाससाठी तासन्तास रखडावे लागत असल्याने त्यांच्या शैक्षणिक नुकसानामुळे पालकही त्रस्त झाले आहेत. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रिदवाक्य एसटी महामंडळाकडून नेहमीच मिरवले जाते; परंतु वास्तविक पाहता त्यांच्याकडून वेळोवेळी प्रवाशांची गैरसोयच केली जात असते. शामगाव परिसरातील सुमारे ५00 विद्यार्थी शाळा तसेच महाविद्यालयात शिकण्यासाठी विद्यानगर आणि कऱ्हाड परिसरात जात असतात. या सर्व विद्यार्थ्यांना कऱ्हाड बस आगारात शैक्षणिक मासिक पास मिळवण्यासाठी तासन्तास रखडावे लागते. यावर पर्याय म्हणून शामगाव, अंतवडी, राजाचे कुर्ले येथील विद्यार्थी पास काढण्यासाठी पुसेसावळी येथे जात असतात. गेल्या वर्षी या परिसरातील विद्यार्थ्यांची पास काढण्याची सोय पुसेसावळीमध्ये करण्यात आली होती. परंतु, यावर्षी या विद्यार्थ्यांना ‘तुमचे गाव खटाव तालुक्यात नसल्यामुळे तुम्हाला पुसेसावळीतून पास काढून मिळणार नाही,’ असे सांगण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कऱ्हाड येथे जाऊन लांबलचक रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. कऱ्हाडातूनही या विद्यार्थ्यांना कृष्णा कॅनॉल ते शामगाव व इतरत्र असाच पास देण्यात येतो. अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज सुटल्यानंतर खासगी क्लास किंवा इतर काही कामांसाठी कऱ्हाडमध्ये जावे लागते. त्यांचा पास कऱ्हाडपर्यंत चालत नसल्यामुळे घरी परतताना त्यांना नाईलाजाने कॅनॉलपर्यंत तिकीट काढावे लागते. यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशाला आर्थिक चटका सहन करावा लागतो. कऱ्हाडात पाससाठी लांबलचक रांगेत उभे राहून अभ्यासाचा वेळही वाया जात असतो. हे टाळण्यासाठी एसटी महामंडळाने शामगाव परिसरातील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे पुसेसावळी येथून पास देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)