शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

आजी सतत अभ्यास कर म्हणतेय म्हणून सहावीतील विद्यार्थ्यांने सोडले घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 20:44 IST

आजी सतत अभ्यास करण्याचा सल्ला देत असल्यामुळे तो वैतागला होता.

सातारा - ‘आजी सतत अभ्यास कर,’ असे म्हणते म्हणून  सहावीतील एका मुलाने  साताऱ्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सातारा बसस्थानक प्रमुख व पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. संबंधित मुलाने यापूर्वीही आपल्या आईला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये बारा वर्षांचा मुलगा एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे आई-वडील मुंबई येथे राहतात. तर तो सातारा येथे आपल्या आजीकडे राहतो. आजी त्याला सतत अभ्यास करण्याचा सल्ला देत असल्यामुळे सततच्या सल्ल्याला तो वैतागला होता. अभ्यास केला नाही तर कधी कधी त्याला आजी मारही देत असत. तो चांगला शिकावा यासाठी त्याच्या आजीने त्याला साताऱ्यातील  एका इंग्लिश मीडियममध्ये एक लाख रुपये फी भरून दाखल केले होते. पुढे खर्च परवडत नसल्याने त्याला दुसºया एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दाखल केले होते. दरम्यान, शनिवारी सकाळची शाळा सुटल्यानंतर आजीने दिलेले पंधरा रुपये घेऊन तो औद्योगिक वसाहतीतून रिक्षाने बसस्थानकात आला. मात्र तेथील गर्दी पाहून त्याला रडू कोसळले. रडतच तो सातारा बसस्थानक प्रमुख सय्यद यांच्या कार्यालयात गेला.सय्यद यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आपण घरातून पळून आल्याची माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून सय्यद यांनी सातारा बसस्थानकातील पोलीस चौकीत कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार, दत्ता पवार यांना या घटनेची माहिती दिली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी सय्यद यांच्या कार्यालयात जाऊन त्याची विचारपूस करून साधारण दोन तास त्याचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याला त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

 कुठंतरी जायचं..पण घरात नाय थांबायचं!

संबंधित अल्पवयीन मुलाकडे पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितलेली माहिती ऐकून पोलीस अवाक् झाले. कुठंतरी जाणार होतो; पण मला घरात थांबायचं नव्हतं. पण तू कुठे जाणार होता, असे पोलिसांनी विचारल्यानंतर त्याने बस जाईल तिकडे जाणार होतो, असे उत्तर दिले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण