शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राची अनास्था तर राज्य सरकार अनभिज्ञ

By admin | Updated: November 16, 2015 23:59 IST

विखे-पाटलांचा आरोप : पूर्णवेळ कृषिमंत्री नाही तर मुख्यमंत्र्यांना गृहखाते सोडवेना

कऱ्हाड : ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, याबाबत केंद्र सरकारची अनास्था दिसत आहेच; पण राज्यातील सरकार तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अनभिज्ञ दिसत आहे. राज्याला पूर्णवेळ कृषिमंत्री नाही, ही बाब गंभीर असून, सरकारने आपले दायित्व निभावण्याची गरज आहे,’ असे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील खासगी दौऱ्यानिमित्त कऱ्हाडला आले असता येथील विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, राजू शिंदे, अविनाश नलवडे आदींनी पुष्पगुच्छ देऊन राधाकृष्ण विखे-पाटील यांचे स्वागत केले. विखे-पाटील म्हणाले, ‘तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या तरीही सरकारला अजूनही जाग आलेली दिसत नाही. राज्याला पूर्णवेळ कृषिमंत्री नाही, तसेच गृहमंत्रीही नाही. मुख्यमंत्री फडणवीस नागपूर सिटी क्राईम कॅपिटल झाली तरी गृहखाते सोडायला तयार नाहीत. त्यामुळे हे सारे प्रश्न कसे मार्गी लागणार हा गहण मुद्दा आहे. राज्यातील सरकाराने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतलेले दिसत नाहीत. ‘जलयुक्त शिवार’ ही कोण्या एका अधिकाऱ्याच्या डोक्यातून आलेली योजना शासन राबवत आहे. अमूक-तमूक टीएमसी पाणीसाठा वाढला, असे तुणतुणे वाजविण्यातच सरकार मश्गुल आहे. परंतु ही त्यांची कल्पना भ्रामक आहे. हे लोकांच्या लक्षात येत आहे. मुंबईतील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाला आपणाला का डावलण्यात आले, कार्यक्रम सरकारचा होता की एका पक्षाचा, याबाबत छेडले असता जे लोक सत्तेतील शिवसेनेलाच बाजूला ठेवतात. तिथे आमचा विषय दूरच; परंतु असे केले तरी आंबेडकरी जनतेचा काँग्रेसवरील विश्वास कमी होईल, अशी त्यांची भावना चुकीची आहे. नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीतील निकाल म्हणजे भाजप सरकारवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याची पोेचपावती आहे. त्यामुळे यातून तरी हे सरकार काही धडा घेईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.’ (प्रतिनिधी)नगराध्यक्षांचे निवेदनविरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना कऱ्हाडच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांनी एक निवेदन दिले. ते हातात घेताच विखे-पाटील यांनी हे काय आहे, असे विचारले. त्यावर त्यांनी नगरसेवकांना असहकार्य करणाऱ्या मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या बदलीचा ठराव करून दोन महिने उलटले तरी प्रशासन लक्ष घालत नसल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले. आपण यात लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी करताच मी पृथ्वीराज चहाण यांच्याशी बोलून काय करायचे ते ठरवतो, असे उत्तर त्यांनी दिले. ं