शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त वडूजकरांचा पाण्यासाठी ठिय्या

By admin | Updated: September 23, 2014 00:10 IST

लाखो लीटर पाणी वाया : चार प्रभागांमध्ये आठवड्यापासून ठणठणाट

वडूज : ‘वडूज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक, चार, पाच व सहामध्ये आठवड्यापासून ठणठणात जाणवत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडला. याबाबत माहिती अशी की, येरळवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून वडूज परिसरात पाणीपुरवठा केला जात आहे. वडूज शहरातील जलवाहिनीला आठवड्यापासून गळती लागली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणीटंचाईची कुऱ्हाड वडूजकरांवर कोसळली आहे, ही गळती दूर करण्यातही प्रशासनाला अपयश येत आहेत. त्यामुळे पाण्याअभावी गृहिणींची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी सोमवारी (दि. २२) सकाळी वडूज ग्रामपंचायतीसमोर काही काळ ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी संबंधितांना खडेबोलही काहीनी सुनावले. ‘तांत्रिक अडचणींमुळे पाणी येत नाही,’ अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. मात्र, आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. हे लक्षात येताच सायंकाळी पाचपर्यंत पाणी येईल, असे तोंडी आश्वासन दिले. वडूज शहराची लोकसंख्या पाहता ग्रामपंचायत सर्व सुविधा देण्यास कमी पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. ग्रामपंचायत सदस्य विवेक येवले यांनी यावर तातडीने तोडगा काढण्यास सांगितले. आयलॅण्ड चौक, हुतात्मा परशुराम विद्यालय, नाथ मंदिर, खडकाचा मळा परिसर आदी मुख्य ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. या गळतीला जबाबदार कोण? असा यक्षप्रश्नही जनतेतून उमटत आहे. ग्रामपंचायत करातून पन्नास लाख वसूल होत असतानाही देखभाल दुरुस्ती करताना ग्रामपंचायतीस नाकीनऊ येत आहे. यासंदर्भात संबंधित विभागाने लक्ष घालून तहानलेल्या वडूजकरांना पाणी द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)