शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

शाहूपुरीतील समस्या तातडीने मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या शाहूपुरी भागातील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. कचरा संकलन, पथदिवे, ...

सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या शाहूपुरी भागातील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. कचरा संकलन, पथदिवे, रस्ते अशा मूलभूत प्रश्नांची प्रशासनाने तातडीने सोडवणूक करावी, अशी मागणी सातारा जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत मुख्याधिकारी अभिजित बापट यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा शहराची हद्दवाढ होत असताना त्याआधी गावठाणामध्ये वाढ होणे गरजेचे आहे. कारण शासकीय येणे कर व नगरपालिका कर या दोन्ही आर्थिक करांचा बोजा नागरिकांवर पडणार आहे. त्यामुळे गावठाण वाढीचा ठराव पालिकेने मंजूर करावा. घनकचरा ट्रॅक्टरवर स्पीकरद्वारे कर भरण्याबाबत वारंवार सूचना केल्या जातात; परंतु नेमका कर कशाप्रकारे व किती भरावा, हे प्रशासनाने स्पष्ट न केल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायतीचा पालिका हद्दीत समाविष्ट झाल्यापासून येथील पथदिवे बंद आहेत. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही याची नोंद घेतली जात नाही. कचरा संकलनासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली असली, तरी यामध्ये अनियमितता आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. शाहूपुरी परिसरातील गेंडामाळ नाका ते शाहूपुरी चौक या रस्त्यावरील खड्डे तातडीने मुजवावे, हद्दवाढीच्या भागात बंदिस्त गटार योजना राबवावी, पूर्वी ८ अ च्या उताऱ्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर वीस रुपये शुल्क भरावे लागत होते. आता नगरपरिषद स्तरावर याच उताऱ्यासाठी तीनशे ते चारशे रुपये मोजावे लागत आहेत. याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे.

निवेदनावर गृहनिर्माण फेडरेशनचे अध्यक्ष नंदकुमार काटे, रंगराव जाधव, दिलीप कडव, सुनील कांबळे, सुनीता राजेघाडगे, मधुकर जाधव, ललित सातघरे, चेतन खराडे, अतुल शिंदे, विक्रम चोरगे आदींच्या सह्या आहेत.