श्री समर्थ वाग्देव महाराज यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:35 IST2021-01-18T04:35:15+5:302021-01-18T04:35:15+5:30

वाठार स्टेशन : राज्यभर प्रसिद्ध असलेले तसेच वाठार स्टेशन पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री समर्थ वाग्देव महाराज रथयात्रोत्सव कोरोनाच्या ...

Shri Samarth Vagdev Maharaj Yatra canceled | श्री समर्थ वाग्देव महाराज यात्रा रद्द

श्री समर्थ वाग्देव महाराज यात्रा रद्द

वाठार स्टेशन : राज्यभर प्रसिद्ध असलेले तसेच वाठार स्टेशन पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री समर्थ वाग्देव महाराज रथयात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक पोलीस प्रशासन, ग्रामस्थ व यात्रा कमिटीने दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यात्रा, उत्सवांवर निर्बंध घातले आहेत. यात्रेतील भाविकांच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने राज्यभरातील सर्व यात्रा, उत्सव रद्द केल्या आहेत. दरवर्षी श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज रथोत्सव साजरा केला जातो. रथोत्सव तसेच यात्रोत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. वाग्देव महाराजांचा रथ समाधी स्थळापासून वाठार स्टेशन तसेच गावातून काढला जातो. रथोत्सवात गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून श्री समर्थ वाग्देव महाराजांची पुण्यतिथी व रथ यात्रोत्सव वाठार स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामस्थ व देवस्थान कमिटीतील पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने यंदाची रथोत्सव यात्रा व सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असा निर्णय घेण्यात आला. यात्रोत्सव काळात मोजक्याच लोकात पारंपरिक धार्मिक विधी पार पाडण्यात येतील. भाविकांनी अजिबात मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन स्थानिक पोलीस प्रशासन व यात्रा कमिटीकडून करण्यात आले.

Web Title: Shri Samarth Vagdev Maharaj Yatra canceled