शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शिवक्रांती हिंदवी सेनेकडून गतिरोधकाला पांढरे पट्टे, दिशादर्शक खुणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस एकीव-कुसुंबीमुरा- चिकणवाडी रस्त्यावरील गतिरोधकांना पांढरे पट्टे नसल्याने रात्रीच्यावेळी अंदाज न आल्यास अपघात होऊ नये ...

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस एकीव-कुसुंबीमुरा- चिकणवाडी रस्त्यावरील गतिरोधकांना पांढरे पट्टे नसल्याने रात्रीच्यावेळी अंदाज न आल्यास अपघात होऊ नये म्हणून शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने निरपेक्ष भावनेतून या आठ ते दहा किलोमीटर परिसरातील गतिरोधकांना पांढरे पट्टे मारण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पारंबे फाट्यापासून उजवीकडे एकीव-कुसुंबीमुरा-चिकणवाडी या मार्गावर मागील काही वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले आहे. दरम्यान, या मार्गावर असणाऱ्या गतिरोधकांचा अंदाज यावा व अपघात टळावा, यासाठी शिवक्रांती हिंदवी सेनेकडून एकीव येथे तीन ठिकाणी, मोळेश्वर येथे दोन ठिकाणी, कुसुंबीमुरा येथे सहा ठिकाणी, तर चिकणवाडी येथे तीन ठिकाणी पांढरे पट्टे मारून रंगकाम करण्यात येत आहे. यामुळे भरधाव वेगात वाहन चालवणारे तसेच रात्रीच्यावेळी गतिरोधकांचा अंदाज न येता होणारा अपघात टळण्यास मदत होत आहे. तसेच धोकादायक वळणावरील रस्त्यावर देखील पांढऱ्या पट्ट्यात रंगकाम केले जात आहे.

गतिरोधकावरील पांढरे पट्टे, धोकादायक वळणावर दिशादर्शक खुणा, सूचना फलकांचा अभाव यामुळे यापूर्वी अनेकदा छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यापुढे धोकादायक वळणावर सूचना फलक लावण्याचे काम करणार असल्याचे शिवक्रांती हिंदवी सेनेकडून सांगण्यात आले. दरम्यान, संस्थापक-अध्यक्ष स्वप्नील धनावडे, खजिनदार सुधीर कांबळे, जावळी तालुकाध्यक्ष शिवाजी गोरे, नवनाथ कोकरे, सुमित कांबळे, अनिकेत जाधव, महेश कोकरे, जगन्नाथ शिंदे, संतोष गोरे, संकेत कोकरे, अंकुश कोकरे, समीर कोकरे, सूरज कोकरे यांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. शिवक्रांती हिंदवी सेनेमार्फत राबवित असलेल्या समाजहितोपयोगी उपक्रमाचे कौतुक होत असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

(कोट)

या मार्गावरील गतिरोधकांना पांढरे पट्टे, धोकादायक वळणावर दिशादर्शक खुणा, सूचना फलक नसल्याने छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढत होते. दरम्यान, अपघाताचा अनर्थ टळला जावा, यासाठी नि:स्वार्थ भावनेतून हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला. यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.

- शिवाजी गोरे, जावळी तालुकाध्यक्ष

फोटो २४पेट्री

शिवक्रांती हिंदवी सेनेच्या सदस्यांनी एकीव-कुसुंबीमुरा-चिकणवाडी रस्त्यावरील गतिरोधकांना पांढरे पट्टे मारण्यात आले.