पाचवडमध्ये रक्तदानाने शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:13 IST2021-02-21T05:13:03+5:302021-02-21T05:13:03+5:30

मायणी : पाचवड (ता. खटाव) येथील जाणता राजा प्रतिष्ठान व महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ८२ ...

Shiva Jayanti celebrated with blood donation in Pachwad | पाचवडमध्ये रक्तदानाने शिवजयंती साजरी

पाचवडमध्ये रक्तदानाने शिवजयंती साजरी

मायणी : पाचवड (ता. खटाव) येथील जाणता राजा प्रतिष्ठान व महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ८२ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवजयंती दिनी अनोखा उपक्रम साजरा केला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. अशात संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात रक्तपेढीमध्ये रक्तसाठ्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे शिवजयंतीला वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा या दोन्ही मंडळांच्यावतीने बॉम्बे रक्तपेढी सांगली यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.

माजी सरपंच काकासाहेब घाडगे, बापूराव घाडगे, ग्रामपंचायत सदस्य गोट्या पाटील, आप्पासो मोहिते, नाथा खैरमोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल घाडगे, संजय अवघडे, किरण घाडगे, विराज घाडगे, पिंटू घाडगे, रोहित लोहार, बालाजी शेलार, आदित्य घाडगे, विजय पाटील व जाणता राजा प्रतिष्ठान व महालक्ष्मी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

२०पाचवड

पाचवडमध्ये रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य आप्पासो मोहिते यांनी केले. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Shiva Jayanti celebrated with blood donation in Pachwad