शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

सातारच्या घटनेचे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र पडसाद; लोकशाहीचा गळा घोटला : एकनाथ शिंदे, माझे रक्त निघाले, अजूनही अंग ठणकतय : शंभूराज देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:54 IST

अंतरवाली सराटीतील घटनेतही तेच अधिकारी

मुंबई : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत दोन सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवत, मंत्र्यांना धक्काबुकी, मारहाण करत लोकशाहीचा गळा घोटला गेला. पोलिस महासंचालक सदानंद दाते, पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी मतदानापासून कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही, असा शब्द आपल्याला दिला होता. पण, तरीही रोखण्यात आले. जे काही घडले ते आधी कधीही घडलेले नव्हते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.

शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली, आरोपींसारखी वागणूक त्यांना देण्यात आली, अशी स्थिती आधी कधीही उद्भवली नव्हती, असे सांगत शिंदे यांनी दोषींवर कारवाईची आग्रही मागणी केली.

माझे रक्त निघाले, अजूनही अंग ठणकतय

सातारमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी पोलिस अधीक्षक तुषार जोशी, पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक उपनिरीक्षक रमेश गर्जे आणि शंभरएक पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. मंत्री मकरंद पाटील धक्काबुक्कीत खाली पडले. माझा शर्ट रक्ताने माखला, अशा शब्दात राज्याचे पर्यटन मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात व्यथा मांडली.

काही पोलिसांनी मला आरोपीस नेतात तसे फरफटत नेले, काहींनी माझे हात-पाय ओढले, कंबरेत हात टाकून खेचले. मला डायबेटीस आहे. माझे अंग आताही ठणकत आहे, गोळ्या खाव्या लागत आहेत, असे देसाई म्हणाले. पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा, न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.

विधान परिषदेत राष्ट्रवादीचे (अजित पवार) विक्रम काळे, संजय खोडके, शिंदेसेनेच्या मनीषा कायंदे यांनीही सातारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. विधानसभेत शिंदेसेनेचे सदस्य अर्जुन खोतकर यांनी हल्लाबोल केला. मंत्री मकरंद पाटील यांनी त्या दिवशीचा घटनाक्रम सांगताना पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

निर्देशांचे पालन करू म्हटले पण स्थगिती मिळाली

विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे जे निर्देश दिले आहेत, त्याचे तंतोतंत पालन सरकार करेल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. पण, दुपारी सभापतींनी या निर्देशांनाच स्थगिती दिल्याने तंतोतंत पालनाची ग्वाही हवेत विरली.

कायदा कोणी तोडला, माणसे कोणी घुसवली? : जयकुमार गोरे

अध्यक्षपद निवडणुकीच्या वेळी जिल्हा परिषद परिसरात तीन-चार हजार लोक घुसवून कायदा व सुव्यवस्था स्थिती कोणी धोक्यात आणली, असा सवाल करत ग्रामविकास मंत्री आणि शिंदेसेनेच्या टीकेचे मुख्य लक्ष्य असलेले जयकुमार गोरे यांनी नाव न घेता मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, आमचेही म्हणणे ऐकून घ्या. वास्तव समजून न घेता निर्देश दिले जात आहेत, या शब्दात त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विषयीही नाराजी व्यक्त केली. कायद्याचे उल्लंघन कोणी केले, याचीही चौकशी झाली पाहिजे. भाजपवर टीका केली जात आहे. पण, भाजपचा कोणताही दोष नाही, असे ते म्हणाले.

अंतरवाली सराटीतील घटनेतही तेच अधिकारी

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनस्थळी पोलिस लाठीमार झाला तेव्हा आताचे सातारचे जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी हे जालनाचे पोलिस अधीक्षक होते. याकडे शिंदेसेनेचे मंत्री, आमदारांनी लक्ष वेधले.

- छत्रपतींच्या राज्यात म्हणजे सातारमध्ये निजामाचे राज्य आले आहे का? लोकशाही शिल्लक आहे की नाही? - आ. हेमंत पाटील (शिंदेसेना).

- मंत्रीच सुरक्षित नसतील तर सामान्यांची काय कथा? राज्यात आणीबाणी आहे का? - आ. अर्जुन खोतकर (शिंदेसेना).

- आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यास निलंबित करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. चुकीचा पायंडा पडू नये, उपसभापतींच्या निर्देशांना स्थगिती द्यावी. - प्रवीण दरेकर (भाजप).

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Incident Echoes in Legislature: Democracy strangled, Minister assaulted.

Web Summary : Satara council election turmoil sparked legislative outrage. Accusations of democracy being strangled arose after a minister reported assault by police, demanding immediate action and investigation into the incident.