शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
4
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
5
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
6
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
7
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
8
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
9
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
10
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
11
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
12
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
13
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
14
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
15
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
16
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
17
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
18
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
20
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
Daily Top 2Weekly Top 5

उत्सुकतेपोटी पवार थेट कार्यशाळेत!

By admin | Updated: June 27, 2014 00:58 IST

कऱ्हाड : सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करू नका; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना आवाहन

कऱ्हाड : राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी कऱ्हाडात सोशल मीडियाबाबत खास कार्यशाळा आयोजित केली होती. त्याला खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, कऱ्हाड दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांना सोशल मीडियाबाबतच्या उत्सुकतेने स्वस्थ बसू दिले नाही. वेणुताई चव्हाण स्मारकात बैठकीसाठी गेलेले पवार थेट सभागृहात गेले अन् त्यांनी तरुणांशी संवाद साधला. त्यांच्या अनपेक्षित आगमनाने तरुणाईत उत्साहत तयार झाला. ‘सोशल मीडिया संवाद साधण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानापासून दूर जाऊन चालणार नाही. आम्ही याकडे दुर्लक्ष केले त्याची किंमत आम्ही आज मोजत आहोत. म्हणून यापुढे तुम्ही या माध्यमाकडे दुर्लक्ष करू नका, फक्त याचा वापर जागरुकपणे करा. पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी करा,’ असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. येथील वेणुताई चव्हाण स्मारकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील तरुण कार्यकर्त्यांसाठी ‘सोशल मीडिया’ या विषयाची कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार बाळासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती. शरद पवार म्हणाले, ‘सोशल मीडियात तुम्हाला किती इंटरेस्ट आहे, हे बघायला मी आवर्जून येथे आलो आहे. आज ७० ते ८० टक्के विद्यार्थी सोशल मीडिया वापरतात. शेतकरी मागासलेला असला तरी त्यांची तरुण पिढी सुधारलेली आहे. या माध्यमाचा आपण आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी वापर केला पाहिजे. तरुणांने आपले ग्रुप व्हॉट्स अ‍ॅपवर तयार केले पाहिजेत. त्यावर एखादी पक्षाला टार्गेट करणारी पोस्ट आली तर ती खुडून काढली पाहिजे अन् आपले चांगले काम इतरांपर्यंत पोहोचविले पाहिजे.’ खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण न करता तरुणांशी संवाद साधला. या कार्यशाळेचा उपयोग आहे का? असं उपस्थितांनाच विचारलं अन् त्याचा वापर पक्षाच्या चांगल्या प्रसारासाठी कसा करायचा, हे पटवून दिलं. राजकारणात यशस्वी अन् मोठं होण्यासाठी वाचनाची गरज आहे. पुस्तके, पेपर वाचायला अडचण असेल तर ई-पेपर वाचा, असा सल्ला द्यायला त्या विसरल्या नाहीत. (प्रतिनिधी)