शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

स्कोलीनचा डोस जीवघेणा...

By admin | Updated: August 20, 2016 22:51 IST

वैद्यक शास्त्रात रोज नवनवे शोध लागत आहेत. तसेच औषधोपचारही मिळू लागले आहेत.

नितीन काळेल -- सातारा --चांगल्या गोष्टी, चांगल्या सवयींमुळे नेहमी चांगलेच होते. तसेच चांगल्या औषधांमुळे रुग्ण बराही होत असतो; मात्र एखाद्या चांगल्या औषधाचा चुकीचा वापर केला तर एखाद्याचा बळीही जातो. अशीच घटना वाईतील खुनाच्या प्रकारामुळे सध्या समोर आली आहे. शस्त्रक्रियेमध्ये महत्त्वाचे ठरणारे ‘स्कोलिन’ हेच ते औषध आहे. या औषधामुळे नैसर्गिक श्वासोच्छवासच बंद होतो. हेच औषध संतोष पोळ याने मारण्यासाठी वापरले असल्याचे पुढे आले आहे. वैद्यक शास्त्रात रोज नवनवे शोध लागत आहेत. तसेच औषधोपचारही मिळू लागले आहेत. पूर्वी शहरात मिळणाऱ्या सुविधा आज निमशहरी, काही मोठ्या खेड्यातील सुसज्ज रुग्णालयांमध्येही मिळू लागल्या आहेत. त्यामुळे मानवाचे जीवन सुसह्य होऊ लागले आहे. एकीकडे असे चित्र असले तरी औषधांचा चुकीचाही वापर होत असल्याचे समोर येत आहे. संजीवनी ठरलेल्या औषधाचा गैरवापर केल्यास जीवही जाऊ शकतो. संतोष पोळ याने केलेल्या खुनाच्या प्रकारामुळे औषधाचा कसा चुकीचा वापर होतो, ते समोर आले आहे. ‘सक्सिनल स्कोलिन’ हे औषध मोठ्या रुग्णालयात, आयसीयूमध्ये वापरण्यात येते. या औषधाचा वापर हा शस्त्रक्रियेवेळी होतो. मोठ्या शस्त्रक्रिया असतील तर हे औषध खूप महत्त्वाचे ठरते. कारण, या औषधामुळे नैसर्गिक श्वास घेण्याची क्रिया बंद होतानाच शरीरातील स्नायू शिथिल होतात. याच औषधाचा चुकीचा वापर होऊ लागला आहे. हे औषध एखाद्याला मारण्यासाठी खूप सोपे ठरू लागले आहे. या औषधाचा डोस दिला तर त्या व्यक्तीचा नैसर्गिक श्वासोच्छवास बंद होतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. सलाईनद्वारे हे औषध दिले तर लगेच त्याचा परिणाम होतो. तर स्नायूद्वारे द्यायचे झाले तर हळूहळू परिणाम होत असतो; पण या औषधाच्या चुकीच्या वापराने मृत्यू निश्चित असतो.तरबेज लोकांकडूनच योग्य वापर...भूलतज्ज्ञ, रुग्णालयाच्या आयसीयूमधील कर्मचारी तसेच कृत्रिम श्वासोच्छवास देण्यास तरबेज असणारे असे मोजके लोकच या औषधाचा वापर योग्य करू शकतात. अन्यथा अभ्यास नाही अशा डॉक्टरांनाही याचा वापर करणे अशक्य आहे. हे औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय बाहेर कोठेही मिळू शकत नाही. मोठ्या शस्त्रक्रिये वेळी ‘सक्सिनल स्कोलिन’ हे औषध महत्त्वाचे ठरते. या औषधाने उत्क्रांती आणली आहे. पण, त्याचा चुकीचा वापर होतो, ते टाळणे महत्त्वाचे आहे. संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांशिवाय त्याचा वापर कोणीही करू नये. - डॉ. अविनाश भोसले, सातारा