शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याला विरोध करणाऱ्यांना आता साताऱ्याचा पुळका

By admin | Updated: August 18, 2014 21:37 IST

शशिकांत शिंदे : तावडे-फडणविसांच्या सातारा दौऱ्यावर कडाडून टीका

कुडाळ : ‘विधानसभेत शिवसेना-भाजपचे आमदार हे पश्चिम महाराष्ट्राच्या अनुशेषाला विरोध करण्याचे पाप करतात. प. महाराष्ट्रात आल्यावर हेच आमदार राष्ट्रवादीच्या नावाने ओरडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. अशा ओरडणाऱ्या विनोद तावडेंनी महाराष्ट्रातील कोणताही विधानसभा मतदारसंघ निवडावा, मी त्यांच्या विरोधात उभा राहून निवडणूक लढवतो. त्यांनी हे आव्हान स्वीकारावे व लढण्याची तयारी दाखवावी,’ असे आव्हान देत सेना-भाजपचा खरपूस समाचार जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी घेतला.  कुडाळ येथे आयोजित राष्ट्रवादी युवक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे, अमित कदम, सभापती रूपाली वारागडे, हणमंतराव पार्टे, मोहनराव शिंदे, सारिका सपकाळ, सुहास गिरी, अ‍ॅड. नितीन भोसले, बाळासाहेब महामुलकर, जयदीप शिंदे, सयाजी शिंदे, सौरभ शिंदे, राजेंद्र भिलारे उपस्थित होते. अमित कदम, प्रमोद पवार, वसंतराव मानकुमरे यांची भाषणे झाली. चंद्रकांत गवळी, समीर आतार, सचिन तरडे यांचा सत्कार करण्यात आला. राजेश वंजारी यांनी प्रास्ताविक केले. धनंजय केंजळे, बुवासाहेब पिसाळ, जितेंद्र शिंदे, कांतीभाई देशमुख, पांडुरंग जवळ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)आता तरी दुटप्पीपणा सोडा!जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपल्याच काही मंडळींनी कुडाळ गटात विरोधी काम केले. सुहास गिरींनी तर दीपक पवार तू पण निवडून ये, मी पण निवडून येतो, अशी भूमिका घेतली. त्याचा पक्षाच्या उमेदवाराला फटका बसला तर आता असा दुटप्पीपणा ठेवू नका, असा टोला गिरींना मानकुमारेंनी लगावला. काही कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी सावध राहावे, अशी सूचना त्यांनी आपल्या भाषणात केली.