शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : चौरंगी लढतीचा उडाला बार!

By admin | Updated: September 25, 2014 23:27 IST

महायुती तुटली / आघाडी फुटली : आयाराम-गयाराम पेचात; बंडखोरांना मात्र लागली लॉटरी

सातारा : शिवसेना-भारतीय जनता पक्षाचा अडीच दशकांचा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा दीड दशकांचा दोस्ताना तुटल्यामुळे संबंधित पक्षात नव्यानेच दाखल ‘आयाराम’ चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. गुरुवारच्या दिवसभरातील घडामोडीनंतर आात सातारा जिल्ह्यातही चौरंगी लढती होणार आहेत. ‘रिपांइ’चे अजूनही तळ्यात-मळ्यात आहे. आघाडी आणि महायुती तुटल्याने प्रत्येक मतदारसंघातील लढती रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सातारा विधानसभा मतदारसंघातून दगडू सकपाळ यांना लढण्यास सांगिलते आहे. भाजपकडून दत्ताजी थोरात, सुवर्णा पाटील, सदाशिव सपकाळ, रवींद्र परामणे, दीपक पवार इच्छुक आहेत. ‘कऱ्हाड दक्षिण’मधून डॉ. अतुल भोसले भाजप तर संजय मोहिते शिवसेनेचे उमेदवार आहेत. कोरेगावातून शिवसेनेकडून हणमंत चवरे, दिनेश बर्गे यांच्यापैकी उमेदवार असणार आहे. भाजपकडून कांताताई नलावडे अथवा महेश शिंदे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे. माण ‘रासप’कडे गेल्याने येथून शेखर गोरे उमेदवार आहेत. शिवसेनेकडून धनाजी सावंत अंतिम होण्याची शक्यता आहे. पाटणमधून शंभूराज देसाई यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तेच उमेदवार असतील. भाजपकडून दीपक महाडिक, कविता कचरे यांनी उमेदवारी मागितली आहे.‘कऱ्हाड उत्तर’मधून सेनेचे समीर जाधव उमेदवार असू शकतात. भाजपबरोबर असल्यामुळे हा मतदारसंंघ स्वाभिमानीकडे राहणार असून येथून मनोज घोरपडे उमेदवार आहेत. नाव चर्चेत आहे. फलटणमधून डॉ. चंद्रकांत तासगावकर उमेदवार असणार आहेत. भाजपकडे चेहराच नाही. परिणामी येथून ‘स्वाभिमानी’चे दिगंबर आगवणे यांनाच उमेदवार मिळणार आहे. युती तुटल्यामुळे वाईत माजी आमदार मदन भोसले यांची गोची झाली आहे. भाजपकडून पुरुषोत्तम जाधव यांचे नाव निश्चित आहे. सेनेकडून येथून डी. एम. बावळेकर अथवा जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे उमेदवार होऊ शकतात. (प्रतिनिधी)